कार्यालयीन कामाकरीता कोईंबतूरला गेलेला सैनिक पॉजिटिव्ह, कामठीतही कोरोना...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

आज एकाच दिवशी चार रुग्ण आढळल्याने कामठी तालुक्‍यातील शहर, ग्रामीण तसेच छावणी परिषद हद्दीत आढळलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या29 झाली असून त्यापैकी12 रुग्ण बरे झाले असून17 रुग्ण "ऍक्‍टिव्ह' आहेत. नागपूर मोमीनपुरा येथे असलेल्या मावस सासूची प्रकृती अस्वस्थ असल्याने कामठी वारीसपुरा येथील एक कुटुंब महिलेच्या भेटीसाठी गेले होते व 15दिवसांपासून तीच्या सेवेत होते. दरम्यान महिला प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील मेयो रुग्णालयात नेतानाच शुक्रवारी 26रोजी तिचा मृत्यू झाला होता.

कामठी (जि.नागपूर): शुक्रवारी नागपूर येथील डोबिनगर मोमीनपुरा भागातील एका चाळीस वर्षीय अत्यवस्थ महिलेचा मृत्यू झाला होता. या मृत महिलेच्या संपर्कात आलेले तिचे कुटुंबीय, कामठी येथील वारीसपुरा रहिवासी असलेले एकाच कुटुंबातील तीन सदस्य पॉजिटिव्ह आढळले असून त्यात एका दाम्पत्यासह दोन वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. छावणी परिसर हद्दीतील फायरिंग रेंजमध्ये असलेले पाच सैनिक कोरोनाबाधित झाल्याच्या घटनेला दिवस लोटत नाहीत, तोच दुसऱ्या दिवशी कार्यालयीन कामाकरीता कोईंबतूर येथून कामठी छावणी परिसरात परत येऊन क्‍वारंटाईन असलेल्या सैन्य कर्मचाऱ्यांच्या आलेल्या तपासणी अहवालात पुन्हा एक 26 वर्षीय सैनिक कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याची घटना आज पुन्हा निदर्शनास आली. बाधित असलेल्या कामठी येथील सैनिकांची संख्या सहा झाली आहे.

अधिक वाचा : "वाकाटकां'च्या राजधानीलाही बाधा, नगरधनमध्ये पसरली दहशत...

मृत महिलेच्या कुटुंबीयांना क्‍वारंटाईन
 आज एकाच दिवशी चार रुग्ण आढळल्याने कामठी तालुक्‍यातील शहर, ग्रामीण तसेच छावणी परिषद हद्दीत आढळलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या29 झाली असून त्यापैकी12 रुग्ण बरे झाले असून17 रुग्ण "ऍक्‍टिव्ह' आहेत. नागपूर मोमीनपुरा येथे असलेल्या मावस सासूची प्रकृती अस्वस्थ असल्याने कामठी वारीसपुरा येथील एक कुटुंब महिलेच्या भेटीसाठी गेले होते व 15दिवसांपासून तीच्या सेवेत होते. दरम्यान महिला प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील मेयो रुग्णालयात नेतानाच शुक्रवारी 26रोजी तिचा मृत्यू झाला होता. यावर संबंधितानी या मृत महिलेच्या थेट प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या कुंटूबिय सदस्याच्या घशाचे नुमने तपासले असता त्यांचा तपासणी अहवाल आज पॉजिटिव्ह आला. यामध्ये कामठी वारीसपुरा रहिवासी असलेले दोन वर्षीय चिमुकलीसह महिलेची 20 वर्षीय मुलगी व 30 वर्षीय जावई तसेच कोळसाटाल, कामठी येथील हल्ली नागपूर रहिवासी असलेली 44 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

हेही वाचा : टमाटर झाले शंभर रूपयांत "लालीलाल'; असे काय झाले...

तणावाचे वातावरण
त्यांच्या संपर्कात आलेल्या कामठी वारीसपुरा येथील एका आठ महिन्यांच्या मुलीसह पाच जणांना वारेगाव येथील विलगीकरण केंद्रात क्‍वारंटाईन करण्यात आले. यावेळी या सदस्यांना क्‍वारंटाईन करण्याच्या मुद्यावरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर उंटखाना जवळील असलेल्या फायरिंग रेंजमध्ये शासकीय सेवा देत असलेले सैनिक हे विभागीय कामकाजानिमित्त इतरत्र बाहेर ठिकाणी जाऊन तुकडी तुकडीने फायरिंग रेंजमध्ये परत आलेल्या सैनिकांना खबरदारी घेण्याच्या उद्देशाने वरिष्ठांच्या आदेशानुसार फायरिंग रेंज मध्येच क्‍वारंटाईन करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी तपासणी करण्याचे आदेशीत केल्यानुसार कामठी मिलिटरी हॉस्पिटल मध्ये झालेल्या कोरोना चाचणी तपासणी अहवालात दोन दिवसांपूर्वी सहा सैनिकांपैकी पाच सैनिक कोरोना पॉजिटिव्ह आढळले. त्यातील एका सैनिकाचे कोरोना तपासणी अहवाल "निगेटिव्ह' आला होता. तोच दुसऱ्या दिवशी कार्यालयीन कामाकरीता कोइंबतूर येथून कामठी छावणी परिसरात परत येऊन क्‍वारंटाईन असलेल्या सैन्य कर्मचाऱ्यांच्या आलेल्या तपासणी अहवालात पुन्हा एक 29वर्षीय सैनिक कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याची घटना आज पुन्हा निदर्शनास आल्याने बाधित असलेल्या कामठी येथील
सैनिकांची संख्या ही सहा झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier who went to Coimbatore for office work positive, Corona in Kamathi too ...