टमाटर झाले शंभर रुपयांत "लाली लाल'; असे काय झाले....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

उमरेड तालुक्‍यातील चांप्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडणारे आहेत. शनिवारी (ता.27) त्याची किंमत एका दिवसात 100 रुपये किलो झाली. टोमॅटोची किंमत मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांना प्रचंड त्रास होत आहे, तर गृहिणी स्वयंपाकघरात टोमॅटोला पर्याय विचारात घेत आहेत.

चांपा (जि.नागपूर):  दोन-तीन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशासह देशातील बऱ्यांच भागात योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकणे भाग पडले होते. आता अचानक नागपूर ग्रामीण भागात त्याचे दर 100 रुपये किलोवर पोचल्यामुळे ग्राहकांना चिंता पडली आहे.

अधिक वाचा  :  मृगया चिन्हाचे संग्रहालय आता नागपुरात होणार...प्रस्ताव तयार करण्याची वनमंत्रयांनी केली सुचना

बाजारात तुटवडा
उमरेड तालुक्‍यातील चांप्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडणारे आहेत. शनिवारी (ता.27) त्याची किंमत एका दिवसात 100 रुपये किलो झाली. टोमॅटोची किंमत मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांना प्रचंड त्रास होत आहे, तर गृहिणी स्वयंपाकघरात टोमॅटोला पर्याय विचारात घेत आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे स्थानिक दुकानदारांनी घाऊक बाजारातून खरेदी करणे बंद केले असून त्यामुळे बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  :  "त्यांच्या' नोकरीवर आहे टांगती तलवार, वाचा सविस्तर

आर्थिक बजेट कोलमडले
लखनौच्या किरकोळ बाजारात टोमॅटो 50 ते 60 रुपयांपर्यंत प्रतिकिलो विकला जात आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील टोमॅटोचे दरही त्या मागोमाग आहेत. नागपूरच्या मंडीमध्ये टोमॅटोची किंमत 1,200 ते 1,300 रुपये प्रतिक्रेट असल्याने चिल्लर विक्रेत्यांनी 100 रुपये किलो भावाने टोमॅटो विकले. त्यात काहींनी टोमॅटो विकत घेणे न झाल्याने टोमॅटोकडे पाठ फिरवली. शहरापेक्षा ग्रामीण भागातील गृहिणीचे टोमॅटोमुळे आर्थिक बजट कोलमडले आहे. भाव वाढीमागील सर्वांत मोठे कारण म्हणजे टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. खरं तर, अलीकडच्या काळात टोमॅटो पिकविणाऱ्या भागात अचानक पाऊस पडल्यामुळे आणि तापलेल्या उष्णतेमुळे टोमॅटोचे पीक खराब झाले आहे. याशिवाय कमी दरांमुळे हरियानाच्या शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी शेतात टोमॅटोचे पीक नष्ट केले. त्यामुळे मंडईमध्ये आवक कमी झाली.

हरियानामधून टोमॅटोची आवक कमी
दिल्लीसह उत्तर भारतात टोमॅटोचा सर्वाधिक पुरवठा हरियाना आणि हिमाचल प्रदेशात आहे. टोमॅटोचा व्यवसाय आणि भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या मते गेल्या दोन आठवड्यांपूर्वी हरियानामधून टोमॅटोची मोठी आवक झाली होती. परंतु, आता हरियानामधून टोमॅटोची आवक कमी होत आहे; कारण पाऊस आणि कडक उन्हामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त, मध्य प्रदेशातील मोठ्या उत्पादक राज्यात कमी दरांमुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पिकाची लागवड करून कांदा लागवड संपविली आहे. कारण भावांतर योजनेत कांद्याला चांगला भाव मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomatoes became 'Lali Lal' for a hundred rupees; what happened ...