क्रीडामंत्र्यांच्या सौभाग्यवतीने गायले, "नयनों में बदरा छाये...'

मनोहर घोळसे
बुधवार, 29 जानेवारी 2020

प्रसंग होता "एक शाम, देश के नाम' या कार्यक्रमाचा. अनुजा केदार यांच्यातील सुप्त गुणांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. यानिमित्ताने त्यांच्यातील एका कलावंताचा परिचय रसिकांना झाला.

सावनेर (जि.नागपूर) :  "नयनों में बदरा छाये, बिजलीसी चमके हाये...' या गीताने "समां' बांधला. "मेरा साया' या चित्रपटातील हे गीत क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सौभाग्यवती अनुजा केदार यांनी अतिशय सुंदररीत्या गायले. रसिकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रसंग होता "एक शाम, देश के नाम' या कार्यक्रमाचा. अनुजा केदार यांच्यातील सुप्त गुणांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. यानिमित्ताने त्यांच्यातील एका कलावंताचा परिचय रसिकांना झाला.स्थानिक व्यापारी संघाच्या वतीने गणराज्य दिनाच्या पर्वावर रविवारी सायंकाळी "एक शाम, देश के नाम' या विषयावर देशभक्ती गीतांचा व हास्यकल्लोळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

क्‍लिक करा :  नागपूरकरांचा प्रवास सुखकर; हिंगणा मार्गावरील मेट्रोला हिरवी झेंडी

सावनेरात व्यापारी संघातर्फे "एक शाम, देश के नाम'
या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजाताई केदार व कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी श्रीमती जिचकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हाफिज यांच्या प्रस्तुत ऑर्केस्ट्रातून विविध देशभक्तीपर गीतांची मेजवानी उपस्थितांना मिळाली, तसेच सिनेकलावंत एहसास कुरेशी यांनी उत्कृष्ट विनोदी हास्यकलेचे सादरीकरण करून उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. याप्रसंगी अनुजा केदार यांनीही "मेरा साया' या सिनेमातील "नयनो मे बदरा छाये' हे गीत गाऊन सर्वांना उत्साहित केले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन, गजानन अर्बन सहकारी संस्था संचालक व व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार, लक्ष्मी महिला नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष शिल्पा बसवार, गिरीश बनाईत आदींच्या वतीने व्यावसायिकांना प्रोत्साहित करून त्यांचा आत्मविश्वास व उत्साह वाढविण्यासाठी "लकी ड्रॉ' पद्धतीने काही व्यवसायिकांना अनुजा केदार, एहसान कुरेशी, विनोद जैन, मनोज बसवार, सुमित लाखानी, अतुल पाटील, तुषार उमाटे, गिरीश बानाईत, पवन जामदार आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप केले. यात लक्ष्मी महिला नागरी सहकारी संस्थेतर्फे देण्यात आलेली "वॉशिंग मशीन' प्राची ऑप्टिकल यांना मिळाली, तर गजानन अर्बनकडून देण्यात आलेला टीव्ही नॅशनल किराणा व्यावसायिकास मिळाला. अन्य भेटवस्तूंचे वाटप मुल्ला इब्राहिम, गजानन गायधने, धीरज अंतरकर, बंटी लाड, चंद्रशेखर कावडकर, हरिहर उपाहारगृह आदींना करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व्यापारी संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.
क्‍लिक करा : चोरीचा मामला; एटीएमही नेला

ताणतणावातून मुक्‍त होण्याचा आनंद
शहरातील विविध धार्मिक कार्यक्रमात पुढाकार घेणाऱ्या व्यापारी संघाने परत एका नवीन कार्यक्रमाचा पायंडा पाळला. व्यावसायिकांच्या वर्षभराच्या ताणतणावानंतरही एक दिवस जरी आनंदाचे क्षण सहकुटुंब व मित्रपरिवारांसह मिळाले, तरी तणावातून मुक्त होण्याचा खरा आनंद मिळतो. तसेच एकत्रित सामाजिक जाणिवेतून खरा आनंद लुटता येतो. सर्व वर्गांतील घटकांना प्रेरणादायी ठरतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports ministers fortunately sang, ...