esakal | ...अन् स्टार बस रस्त्यावर सोडून चालकांनी काढला पळ; मोबाईल जप्तीमुळे संताप 
sakal

बोलून बातमी शोधा

star bus

महापालिकेच्या परिवहन विभागाने राज्य परिवहन मंडळाच्या नियमानुसार बसचालकांना बसमध्ये ॲन्‍ड्रॉईड मोबाईल तर कंडक्टरला कुठल्याही प्रकारचा मोबाईलच्या वापरावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. मात्र तरीही शहरबसमध्ये चालक व वाहक दोघेही मोबाईलचा वापर करीत आहेत. 

...अन् स्टार बस रस्त्यावर सोडून चालकांनी काढला पळ; मोबाईल जप्तीमुळे संताप 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर ः ॲन्ड्रॉईड मोबाईल वापरताना आढळल्यामुळे महापालिकेच्या परिवहन विभागाने दहा चालकांचे तर दोन कंडक्टरचे मोबाईल जप्त केले. या कारवाईमुळे  संतप्त झालेल्या दोन चालकांनी शहर बस रस्त्यावर सोडून पळ काढला. परिणामी त्यांना बडतर्फ करण्यात आले. इतर चालक व कंडक्टरवर हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या परिवहन विभागाने राज्य परिवहन मंडळाच्या नियमानुसार बसचालकांना बसमध्ये ॲन्‍ड्रॉईड मोबाईल तर कंडक्टरला कुठल्याही प्रकारचा मोबाईलच्या वापरावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. मात्र तरीही शहरबसमध्ये चालक व वाहक दोघेही मोबाईलचा वापर करीत आहेत. 

भारतरत्नांना कोणासमोरही देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका 

परिवहन सभापती बाल्या बोरकर यांच्या नेतृत्त्वात आज अचानक बस तपासणी करण्यात आली. यावेळी दहा चालक तसेच दोन वाहकांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल आढळून आले. या सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले. यातील दोन चालक मोबाईल जप्त केल्याने संतप्त झाले. त्यांनी प्रवासी असलेली बस रस्त्यावरच सोडून पळ काढला. 

प्रवाशांना रस्त्यावर सोडल्याने त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात आले. इतर चालक व वाहकांवर एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय ते दुसऱ्यांदा मोबाईलसह आढळल्यास त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा बोरकर यांनी दिला. 

'बर्ड फ्लू'मुळे बकरे, मासे खाऊ लागले भाव, दर...

दरम्यान आज दहा तपासणी पथक तयार करण्यात आले. प्रत्येक पथकात तीन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आता रस्त्यावर धावणाऱ्या २५२ बसची तपासणी करण्यात येणार आहे. यातून महसूल वाढण्याचा विश्वास बोरकर यांनी व्यक्त केला. फेब्रुवारीअखेर बसच्या संख्येत आणखी वाढ करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ