esakal | आऊटडोअर खेळांनाही परवानगी द्या; खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा पदाधिकाऱ्यांची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

start outdoor games also players and coach seek to government

गेल्या आठ महिन्यांपासून शेकडो खेळाडू घरीच व्यायाम व हलका वर्कआऊट करीत आहेत. आम्हालाही सरावाची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. 

आऊटडोअर खेळांनाही परवानगी द्या; खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा पदाधिकाऱ्यांची मागणी 

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : उशिरा का होईना उपराजधानीतील इनडोअर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज' सुरू झाल्यात. मात्र आऊटडोअर खेळ अजूनही बंदच आहेत. त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाने आऊटडोअर खेळांनाही लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यापासून खेळाडूंचा सराव बंद आहे. त्यामुळे खेळाडूंना नियमित सरावाला अचानक ब्रेक लागला. खेळाडूंनी कसेबसे आठ महिने सरावाविना काढल्यानंतर नुकतीच राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने इनडोअर खेळांना हिरवी झेंडी दाखविली. त्यामुळे आता हळूहळू गाडी रुळावर येऊ लागली आहे. 

अधिक वाचा - सायंकाळी ५.३९ ते ८.३० या वेळेत करा लक्ष्मीपूजन; सर्वोत्तम मुहूर्त

बॅडमिंटन, जलतरण, नेमबाजी व योगा क्रीडा प्रकारातील खेळाडू 'फिजिकल डिस्टंन्सिंग'चे पालन करीत सरावाला जोमाने भिडले आहेत. मात्र आऊटडोअरमध्ये सराव करणारे कबड्डी, खो-खो या देशी खेळांसह क्रिकेट, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारातील खेळाडू अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. 

गेल्या आठ महिन्यांपासून शेकडो खेळाडू घरीच व्यायाम व हलका वर्कआऊट करीत आहेत. आम्हालाही सरावाची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. 

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

धंतोलीतील यशवंत स्टेडियमवर सराव घेणारे हॅण्डबॉल प्रशिक्षक डॉ. सुनील भोतमांगे म्हणाले, शासनाने मॉल, सिनेमागृह व व्यावसायिक प्रतिष्ठानांसह इनडोअर खेळांना परवानगी दिली. त्याच धर्तीवर आऊटडोअर खेळांनाही शक्य तितक्या लवकर परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. खेळाडूंच्या भावना लक्षात घेता, शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

संपादन - अथर्व महांकाळ