
पारशिवनी (जि.नागपूर) : शेतातील हाती आलेले पीक लॉकडाउनमुळे बाजारपेठ बंद असल्याने घरी पडून आहे. नेमका पैसाअडका हाती येण्याच्यावेळी आलेले कोरोनाचे संकट पाहता आज शेतपिकाला विकताही येत नाही आणि बाजारात खरेदीदारही नाही. त्यामुळे आता करावे तरी काय, असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
आपत्तीत आधार द्यावा
घरी असलेल्या कापसात अळ्या पडत असून रोगराई पसरण्याची वेळ आली आहे. शेतकरी वैतागला आहे. त्याची समस्या शासन सोडवणार कधी? कोरोना वायरसच्या काळात प्रश्न सुटेल, अशी आशाही दिसत नाही. त्याकरिता शासनाने आतातरी शेतकऱ्यांच्या घरी असलेला कापूस खरेदी करून या संकटकाळात आलेल्या आपत्तीत आधार द्यावा, अशी मागणी होत आहे. हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. तो विकणार कधी, याच चिंतेत शेतकरी भरडला जात आहे. शासनामार्फत खरेदी करण्यात येणारी तूर, हरभरा, धान याचीही खरेदी बंद आहे. त्यामुळे येणारा पैसा हा माल विकल्यशिवाय पदरात पडणार नाही. "लॉकडाउन'च्या काळात संपूर्ण शासकीय बाजार समित्या बंद असून खरेदीही बंद आहे. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता, हे खरेदी केंद्र सुरू करून कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी
कोंढाळी : आजच्या परिस्थितीत काटोल तालुक्यातील कापूस उत्पादकांकडे 50 टक्के कापूस त्यांच्या घरात वेचणी करून ठेवला आहे. मात्र, शासनाने सीसीआय व फेडरेशनने खरेदी बंद केली आहे. ती सुरू करावी, अशी कापूस उत्पादकांची मागणी आहे. याबाबत काटोल तालुक्यातील "द शेतकरी सहकारी जिनिंग' या संस्थेला भेट दिली असता या सहकारी जिनिंगचे अध्यक्ष नितीन डेहणकर यांनी सांगितले की, लॉकडाउनदरम्यान शेतमाल उत्पादन, विक्री, खरेदीला लॉकडाउनमधून वगळले. मात्र, कापूस उत्पादकांकडे असलेला कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआय किंवा फेडरेशनला सरकार आदेश देत नाही, तोपर्यंत कापूस उत्पादकांकडून कापूस कसा खरेदी करावा, असा सवाल जिनिंगचे अध्यक्ष नितीन डेहणकर यांनी केला.
लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढविले आहे. पुढेही हा कालावधी वाढविला जाऊ शकतो. खरीप हंगाम जवळ येत आहे. शेतीची मशागत, बी-भरणाकरिता शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. कापूस, गहू, चना खळ्यात मळ्यात आहे. मजूर घराबाहेर पडत नाहीत. शेतीची कामे करण्यास लागणारा पैसा त्याकरिता शेतकऱ्याने पिकाला विकायचे कसे? कापूस केंद्रावर मजूर कामावर येण्यासाठी तयार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास जिनिंगचे अध्यक्ष व कामगार तयार आहेत. तरी शासनाने कोव्हिड 19चे नियम, अटी शर्तीचे पालन करत कापूस, गहू, चना या पिकाचे हमीभाव केंद्र सुरू करावे, ही अपेक्षा आहे.
कापूस खरेदी केंद्र सुरू करणे शेतकरी हिताचे
कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. तेही विकणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी डबघाईस आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू शेतकरी हिताचे आहे.
-शुभम राऊत, युवा शेतकरीशेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
लवकरात लवकर कापूस खरेदी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही, तसेच घरी असलेला कापूस हा आता रोगराईला आमंत्रणा देत असून घरातील कापूस शासनाने लवकर खरेदी करावा, नी कापूस खरेदी केद्र सुरू करावे.
डॉ. प्रमोद भडकमी भावात कापूसखरेदी
शेतकरी हा कापूस आता कुठे विकणार? व्यापारी कमी भावात कापूस खरेदी करणार हेही तेवढेच खरे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपाशी मरण्याची पाळी येणार आहे. त्याकरिता लवकरात लवकर कापूस खरेदी केद्र सुरू करणे गरजेचे आहे.
-देवराव गोमकाळे
शेतकरी भागीमहारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.