राज्यातील कोविड प्रयोगशाळांची संख्या तोकडीच... चाचण्या वाढविण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

राज्यात कोविड निदान चाचण्यांची गती वाढण्याची गरज आहे. परंतु त्या प्रमाणात प्रयोगशाळांची संख्या नसल्यामुळे राज्यात मागील तीन महिन्यात कोल्हापूरसारख्या शहरात एकच प्रयोगशाळा उभारता आली. तीन महिन्यात 20 हजारावर कोरोनाच्या निदान चाचण्या करता आल्या.

नागपूर : पहिल्या कोरोनाबाधिताचा 17 मार्च रोजी मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. राज्यात पुणे येथे एकच राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा होती. दोन महिन्यांत अल्पावधीत महाराष्ट्रात कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची संख्या 75 वर पोहचली खरी, मात्र अडिच कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात ही संख्या तोकडी आहे.

खासगी वैद्यकीय महाविद्यालये कोविड प्रयोगशाळा तयार करण्यास इच्छूक नसल्याचे पुढे आले. यामुळे भारतीय वैद्यक परिषदेने कोविड प्रयोगशाळा प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात असावी हा निकष लावला असल्याची माहिती आहे. यामुळे अखेर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी कोविड प्रयोगशाळा सुरू करण्यावर भर दिला आहे. याचा लाभ राज्यातील जनतेला होणार आहे. 

राज्यात कोविड निदान चाचण्यांची गती वाढण्याची गरज आहे. परंतु त्या प्रमाणात प्रयोगशाळांची संख्या नसल्यामुळे राज्यात मागील तीन महिन्यात कोल्हापूरसारख्या शहरात एकच प्रयोगशाळा उभारता आली. तीन महिन्यात 20 हजारावर कोरोनाच्या निदान चाचण्या करता आल्या. येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा असती तर ही संख्या दुपट झाली असती. परंतु खासगी वैद्यकीय महाविद्यलयांनी प्रथम हात झटकले होते.

मात्र कोविड प्रयोगशाळा हा वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे, हा निकष ठरवून दिला आहे. राज्यात दर दिवसाला सुमारे 20 हजार किंवा त्यापेक्षा अधिक कोविड चाचण्या व्हाव्यात असे संकेत आहेत. मात्र हा आकडा अद्यापही पार करता आला नाही. यामुळेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा तयार करण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये "कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा' सुरू झाल्यात तर कोरोना निदान चाचण्यांची संख्या वाढेल. 

खासगी वैद्यकीय महाविद्यालयात "कोविड प्रयोगशाळा' 
लोकहितासाठी खासगी वैद्यकीय महाविद्यालयाक प्रयोगशाला तयार होणे आवश्‍यक आहे. प्रयोगशाळांच्या प्रस्तावना केंद्र शासनाकडून तातडीने मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूर येथील पीसीआर यंत्र जळगाव येथील कोरोनाची स्थिती बघता येथील वैद्यकीय महाविद्यालयात या यंत्राचा वापर करून प्रयोगशाळा उभारली, यासंदर्भात वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांच्याशी संपर्क साधला, ते बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 

सावध व्हा, सॅनेटायझर दान देण्याच्या नावावर तरुणास बसला मोठा फटका, वाचा हा प्रकार...

दंत महाविद्यालये कोविड प्रयोगशाळेपासून दूर 
प्रत्येक खासगी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यात 21 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांपैकी पाच ते सहा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी हालचाल सुरू केली आहे. याशिवाय शासकीय तसेच खासगी दंत महाविद्यालयांमध्येही ही प्रयोगशाळा तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सुतोवाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी दिले होते. परंतु राज्यातील दंत महाविद्यालये कोविड प्रयोगशाळेपासून अद्यापही दूर आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government decision to improve number of covid labs