नागपूर मेट्रोच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; तब्बल ३३३ कोटींच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी

state government gave permission to expansion of nagpur metro
state government gave permission to expansion of nagpur metro

नागपूर ः नागपूरशी शेजारी जिल्हे जोडण्यासाठी मेट्रो रेल्वेच्या विस्तारित ३३३ कोटींच्या प्रकल्पास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे सादर केला जाणार असून, विदर्भाच्या विकासाच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, रामटेक तसेच भंडारा आणि वर्धा जिल्हा मेट्रोने जोडण्यात येणार आहे. ही शहरे मेट्रोला जोडण्याची स्थानिक नागरिकांची मागणी होती. अनिल देशमुख यांनी याकरिता पाठपुरावा करीत होते. त्याच्या प्रयत्नाला यश आले आहे. 

रेल्वेच्या ब्रॉडगेज (बिजी) मार्गावरून ही वातानुकूलित मेट्रो ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पासाठी ३३३.६० कोटी रुपये खर्च होणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे अर्थसाहाय्य म्हणून २१ कोटी ३० लाख एवढी रक्कम बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. तसा आदेश गुरुवारी (ता.१९) ला काढण्यात आला असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

काटोल - नरखेड मार्ग हा सर्वांत जास्त म्हणजे ८५.५३ किमी अंतराचा असून यात ११ स्थानके राहणार आहेत. भंडारा मार्ग ६२.७ किमीचा असून यात ११ स्थानके राहणार आहेत. वर्धा मार्ग ७८.८ किमीचा असून यात ८ स्थानके राहणार आहेत. 

रामटेक मार्गावर ८ स्थानके असून हा मार्ग ४१.६ किमीचा राहणार आहे. या प्रकल्पामुळे या सर्वच मार्गावरील शहरे आणि गावे नागपूरशी जोडली जाणार असल्याने याचा फायदा हा सामान्य नागरिकांना होणार आहे.   

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com