थंडीचे दिवस, दिवाळीच्या सणाला ‘अलर्ट’ रहा; तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला सल्ला

मनोहर घोळसे
Sunday, 8 November 2020

मागील महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत मृत्यूदर आणि बाधितांची संख्या खाली आली आहे. त्यामुळे कोरोनाविषाणू बाबत जनमानसातील भय कमी झाले आहे. मात्र असे जरी असले तरीसुद्धा थंडीच्या दिवसात व्हायरसचा प्रादुर्भाव होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो.

सावनेर (जि. नागपूर) : कोरोना संक्रमणाच्या काळात येणारा महत्वपूर्ण दिवाळीचा सण व हिवाळ्यातील थंडीचे दिवस यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता, एलर्जी, धूम्रपान आणि प्रदूषणामुळे होणारा श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी ‘अलर्ट’ असावे, याविषयी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात चर्चा केली. चर्चेदरम्यान मान्यवरांनी थंडीचे दिवस व दिवाळीच्या सणाला सावध राहून घ्यावयाची खबरदारी व काही उपाययोजना सुचविल्या.

सावनेर येथील कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘कॉफी विथ सकाळ’ या सदराखाली शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा संवाद घडवून आणण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दमा अस्थमा विशेषज्ञ डॉ. शशांक वानखेडे, दमा, चर्म रोगतज्ज्ञ डॉ. विवेक पांडे व कृष्णा मेडिकलचे संचालक गोपाल घटे यांनी सहभाग दर्शविला.

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

मागील महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत मृत्यूदर आणि बाधितांची संख्या खाली आली आहे. त्यामुळे कोरोनाविषाणू बाबत जनमानसातील भय कमी झाले आहे. मात्र असे जरी असले तरीसुद्धा थंडीच्या दिवसात व्हायरसचा प्रादुर्भाव होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. नागरिकांनी दिवाळीच्या सणानिमित्ताने बाजारातील गर्दी टाळावी, मास्कचा वापर करून आरोग्यविषयक गाईडलाईनचे पालन करावे, असे डॉ. पांडे म्हणाले.

कोरोनाच्या सावटामुळे नागरिकांनी दिवाळीला फटाक्यांची आतषबाजी टाळावी असा सल्ला गोपाल घटे यांनी दिला. कोरोना रुग्णांना आजारातून बरे झाल्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत अशक्तपणा, हात पाय दुखणे, दम भरून येणे आदी लक्षणांचा त्रास होऊ शकतो.

जाणून घ्या - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

अशा रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बरेचदा प्रदूषणामुळे कोळसा खान कामगार, शेतकरी, फुटपाथ विक्रते आदींना श्वसनाचा त्रास होऊन दमा आजार होऊ शकतो. धुम्रपान करणाऱ्यांनाही दमा आजार होत असल्याने सावधानता बाळगावी, असे डॉ. शशांक वानखेडे म्हणाले.

कोविड आणि कोविड-१९ नंतरची लक्षणे श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, कोरडा खोकला, ताप आणि थकवा, चव न कळणे, वास न येणे, वेगाने चालल्यावर किंवा जिना चढल्यावर श्वास भरून येणे, खोकला येणे, छाती मध्ये दाटल्यासारखे वाटणे, छातीत शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे, दीर्घकाळापासून खोकला येत असून औषधानेही कमी होत नसल्यास, वारंवार सर्दी शिंका येणे आणि पावसाळ्यात व हिवाळ्यात जास्त प्रमाण वाढणे,

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

एखाद्या वस्तूची एलर्जी असणे, छातीत दुखणे, धूम्रपानाने हृदयरोग झाला आहे, पण पायातली सूज थकवा कमी होत नाही, अशी लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांनी घाबरण्याची गरज नाही. वेळीच तपासण्या कराव्यात, असे अस्थमा दमा विशेषज्ज्ञ डॉ. शशांक वानखेडे म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stay alert On cold days and Diwali