रेल्वे प्रवाशांनो, फलाट तिकीट बंदच!

योगेश बरवड
Sunday, 8 November 2020

तिकीट विक्री सुरू करण्यात आली असली तरी गर्दी होऊ नये म्हणून फलाट तिकिटांची विक्री बंदच ठेवण्यात आली आहे. परिणामी आठ महिन्यांपासून फलाट तिकिटातून मिळणारे उत्पन्न ठप्पच आहे.

नागपूर : कन्फर्म तिकीट नसेल तर प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेशच नाकारला जात आहे. एवढेच नाही तर गर्दी टाळण्यासाठी फलाट तिकिटांची विक्रीही बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी त्यातून मिळणारे रेल्वेचे उत्पन्नही बुडाले आहे. 

‘गुच्छी‘चे दर किलोला तीस हजार तरीही संपते हातोहात, जाणून घ्या कारणे...

कोरोना संक्रमणाचे आक्रमण टाळण्यासाठी प्रारंभी गर्दी नियंत्रणावरच भर दिला गेला. प्रथम मार्च महिन्यात फलाट तिकिटांचे दर ५० रुपये करण्यात आले. त्यानंतर २३ मार्चपासून रेल्वे सेवाच ठप्प झाली. तेव्हापासूनच फलाट तिकिटांची विक्रीही बंद करण्यात आली. रेल्वे सेवा पुन्हा बहाल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिकीट विक्री सुरू करण्यात आली असली तरी गर्दी होऊ नये म्हणून फलाट तिकिटांची विक्री बंदच ठेवण्यात आली आहे. परिणामी आठ महिन्यांपासून फलाट तिकिटातून मिळणारे उत्पन्न ठप्पच आहे. गत आर्थिक वर्षात नागपूर स्टेशनवरून १८ लाख ८९ हजार फ्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री झाली. त्या माध्यमातून रेल्वेला वर्षभरात एक कोटी ८८ लाख ९९ हजार रुपयांचा महसूल मिळाला. अर्थात महिन्याला दीड लाखांचे तिकीट तर महिन्याकाठी १५ लाखांचा महसूल रेल्वेला मिळाला. 

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

टाळेबंदीच्या काळात रेल्वेने पार्सल व मालवाहतुकीतून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला, तर दुसऱ्या बाजूने विचार केल्यास प्रवासी वाहतुकीतून येणाऱ्या महसुलापासून रेल्वेला वंचित राहावे लागले. जीवनमान सुरळीत झाल्यानंतर बंगळूर आणि मुंबईतील काही ठिकाणी फ्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री ५० रुपये केली आहे. नागपुरात मात्र यासंदर्भात निर्णय होई शकला नाही. गतवर्षी नागपूर रेल्वे स्थानकावरून उणेपुरे ज्या फ्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री झाली. त्यातून पावणे दोन कोटीहून अधिकचा महसूल मिळाला होता. यंदा मात्र नुकसानच आहे. अजूनही बऱ्याच अंशी लॉकडाउन असणारी रेल्वे सेवा ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

(संपादन : प्रशांत राॅय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: still no selling of platform tickets