प्रक्रिया करीत असलेल्या सुपारीचे घेतले नमुने आणि उघडकीस आला हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

भंडारा रोडवरील चंद्रनगर येथील पायल बिअर बारच्या मागे, वर्मा गॅरेजच्या शेजारील नकूल बुधारू सारवा यांच्या मालकीचे मे. नकुल सारवा सुपारी प्रोसेसिंग युनिट या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. दरम्यान, तेथे तपासणी केली असता सुपारीवर प्रक्रिया करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुपारीचे नमुने घेण्यात आले. तपासणीत सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरून 11 हजार 496 किलोंचा सुपारीचा साठा ताब्यात घेतला. त्याची किंमत 32 लाख 68 हजार 860 एवढी आहे.

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने येथील सुपारी कारखान्यावर छापा टाकून 32 लाखांचा साठा जप्त केला. विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सुपारी प्रक्रिया करणाऱ्या अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यात निकृष्ट दर्जाची सुपारी असल्याचे लक्षात आल्याने 11 हजार 496 किलो सुपारी जप्त केली. गेल्या आठ दिवसातील सलग तिसरी कारवाई आहे.

भंडारा रोडवरील चंद्रनगर येथील पायल बिअर बारच्या मागे, वर्मा गॅरेजच्या शेजारील नकूल बुधारू सारवा यांच्या मालकीचे मे. नकुल सारवा सुपारी प्रोसेसिंग युनिट या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. दरम्यान, तेथे तपासणी केली असता सुपारीवर प्रक्रिया करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुपारीचे नमुने घेण्यात आले. तपासणीत सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरून 11 हजार 496 किलोंचा सुपारीचा साठा ताब्यात घेतला. त्याची किंमत 32 लाख 68 हजार 860 एवढी आहे.

अवश्य वाचा- हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन्‌...

अन्न व औषध प्रशासनाने मागील वर्षात सुपारी या अन्न पदार्थाचे एकूण 38 नमुने घेतले. त्यात 5,32,600 किलो सुपारी जप्त केली असून, त्याची किंमत 10 कोटी 50 लाख 46 हजार 977 रुपये आहे. तसेच यंदा एप्रिल ते जून या काळात 11 ठिकाणी धाडी टाकल्या असून, एक लाख दहा हजार 599 किलोंची सुपारी जप्त केली. त्याची किंमत दोन कोटी 69 लाख 70 हजार 842 आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) चं. भा. पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stocks of betel nuts worth Rs 32 lakh seized