धावत्या कारने घेतला पेट ; पेट्रोल टॅंक झाली "लिक'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

सुदैवाने कारचे मालक मारोती शिवराम फुलझले (वय 65, एनआईटी कॉमप्लेस आयुर्वेदिक ले-आउट, नागपूर) हे वेळीच कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

चांपा (जि.नागपूर) ः भरधाव असलेल्या कारने भररस्त्यातच अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी (ता. 25) दुपारी 1:40 वाजताच्या सुमारास चांप्याच्या शिवारात घडली. या घटनेत लाल रंगाची कार अक्षरशः जळून खाक झाली. सुदैवाने कारचे मालक मारोती शिवराम फुलझले (वय 65, एनआईटी कॉमप्लेस आयुर्वेदिक ले-आउट, नागपूर) हे वेळीच कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, त्यांच्या कारची "पेट्रोल टॅंक लिक' झाल्याने अचानक कारने पेट घेतला असल्याची माहिती फिर्यादी कारचालक मारोती शिवरामजी फुलझले यांनी दिली.

क्‍लिक करा -आनंदवार्ता.... आता एकाच ऍपवर सर्व विभागांच्या तक्रारी

अवघ्या काही मिनिटांत कार जळाली
प्राप्त माहितीनुसार, मारोती शिवरामजी फुलझले हे त्यांच्या कारने नागपूरवरून उमरेडच्या दिशेने येत होते. दरम्यान, नागपूर ते उमरेड महामार्गावरील चांपा शिवारातील एका ढाब्यासमोरून कार जात असताना सुमारे दीडच्या सुमारास अचानक कारच्या समोरच्या भागातून धूर निघाला व काही क्षणातच कारने पेट घेतला. हे पाहून कारचालक मारोती फुलझले व त्यांच्या कुटुंबीयांसह तत्काळ कारच्या बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अवघ्या काही मिनिटांत कार पूर्णपणे जळाली.

क्‍लिक करा - प्रेमासाठी वाट्‌टेल ते , प्रियकराला वाचविण्यासाठी केले असे

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. परंतु, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. कारचालक त्यांच्या पत्नी नंदा व सोबत सासरे प्रल्हाद गायकवाड होते. कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात धावपळ झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ कुहीचे ठाणेदार पंजाबराव परघने सोबतच सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे, दिलीप लांजेवार, पवन सावरकर, अमित पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली व अपघाताची पाहणी करून पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A stomach taken by a running car; Petrol tanker gets "leaked"