आश्चर्य! यकृत, पित्ताशय नाभीबाहेर असलेल्या बाळाचा जन्म; पुढे काय झालं वाचा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

महिलेच्या उदाहरणावरून तिची सोनोग्राफी टेस्ट झाली नव्हती, हेच स्पष्ट होते. मात्र, नवजात शिशू विभागाचे प्रमुख डॉ. मनोज भटनागर यांच्याशी या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी 20 हजारांत असे एखादे बाळ जन्माला येते. अशा बाळाचे वजन सामान्य मुलांच्या वजनापेक्षा जास्त असते.

 नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रसूती विभागात यकृत, पित्ताशय, मोठे आतडे, लहान आतडे नाभीबाहेर असलेल्या बाळाचा जन्म झाला. वॉर्ड क्रमांक 22 मध्ये हे बाळ जन्माला आले. जन्मानंतर काही वेळातच यकृत, पित्ताशयासह सर्व भाग येथील पेडियाट्रिक सर्जरी विभागातील डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेतून पोटात टाकले. सध्या ते बाळ मेडिकलच्या बालरोग सर्जरी विभागात आहे. वैद्यकीय भाषेत या बाळाला बेक्विथ विडमन सिंड्रोम असे संबोधण्यात येत असल्याची माहिती आहे.

मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 22 मध्ये रविवारी दुपारी बाळ जन्माला आले. जन्म देणारी माता अतिशय गरीब घरातील. या मातेने गर्भधारणेनंतर औषधोपचार घेतलेले असावेत, मात्र सोनोग्राफी करण्यात आली किंवा नाही, हे मात्र कळायला मार्ग नाही. नऊ महिन्यांत एकदाही तपासणी केली नसल्याने बाळाच्या शरीराबाबत तिला माहितीच नसावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

अधिक माहितीसाठी - 'लिव्ह इन'मध्ये राहायचे प्रेमीयुगुल; संबंधात अडथळा आल्याने युवक चवताळला अन्‌...

महिलेच्या उदाहरणावरून तिची सोनोग्राफी टेस्ट झाली नव्हती, हेच स्पष्ट होते. मात्र, नवजात शिशू विभागाचे प्रमुख डॉ. मनोज भटनागर यांच्याशी या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी 20 हजारांत असे एखादे बाळ जन्माला येते. अशा बाळाचे वजन सामान्य मुलांच्या वजनापेक्षा जास्त असते. जीभ तोंडातून बाहेर आलेली असते. पोटाचा भाग पूर्णपणे विकसित झाला नसल्यामुळेच आतड्या, पित्ताशय, यकृत बाहेर दिसते. बाळावर सर्जरी करून सर्व अवयव पोटात घालण्यात आले आहेत. 

या महिलेची प्रसूती नॉर्मल झाली. बाळाच्या पोटातील सर्व भाग नाभीच्या बाहेर असल्याने हे बाळ जगेल किंवा नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. बाळाची प्रकृती तशी जन्मतःच चिंताजनक होती. अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळाला किती आयुष्य मिळेल हे सांगता येत नाही. संसर्गाचा धोका असतो.

क्लिक करा - नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना

बाळांना संसर्ग होण्याचा धोका जास्त 
या बाळाचे वजन साडेतीन किलो आहे. जीभ बाहेर निघाली आहे. पोट विकसित न झाल्याने ते उघडे असते. वीस हजारात एखादे बाळ असे जन्माला येते. याला वैद्यकीय भाषेत बेक्विथ सिंड्रोम असे म्हणतात. अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. 
- डॉ. मनोज भटनागर, 
एनआयसीयू विभाग, मेडिकल, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strange baby born in Nagpur medical hospital