
प्रेमात बुडालेल्या युवतीने सूरजच्या बोलण्यावर विश्वास केला. सूरज आपल्याशी लग्न करणार असल्यामुळे ती आनंदी होती. याचाच लाभ घेत त्याने तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवला. लग्न करणार असल्यामुळे युवतीने होकार दिला.
यवतमाळ : एकाच जिल्ह्यातील मुला-मुलीमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलांनी मस्त फिरण्यास सुरुवात केली. फोनवरील संभाषण वाढले. भेटी वाढल्या. यामुळे प्रेम अधिकच घट्ट झाले. अशात युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. युवतीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत सर्वस्वी वाहून दिले. त्यांचे प्रेम शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत पोहोचले. मात्र, युवतीचे एक चूक झाली अन् जिवावर बेतली...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव कोंरबी येथील 28 वर्षीय युवक सूरज मुसळे याचे एका युवतीवर प्रेम होते. युवतीही सूरजवर प्रेम करीत होते. यामुळे दोघांच्या भेटी-गाठी वाढल्या. दररोज भेटणे, फिरायला जाणे, हॉटेलमध्ये बसने हे नित्याचेच झाले होते. यामुळे त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले.
हेही वाचा - तिसरे मंगलाष्टक सुरू झाल्यावर वधू म्हणाली, "तू मला पसंत नाहीस"
युवती आपल्या प्रेमात पूर्णपणे बुडाल्याचे पाहून सूरजने तिचा फायदा घेण्याचे ठरवले. यानुसार त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. प्रेमात बुडालेल्या युवतीने सूरजच्या बोलण्यावर विश्वास केला. सूरज आपल्याशी लग्न करणार असल्यामुळे ती आनंदी होती. याचाच लाभ घेत त्याने तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवला. लग्न करणार असल्यामुळे युवतीने होकार दिला.
यानंतर सूरज युवतीला पळवून आपल्या घरी घेऊन गेला आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. लिव्ह इनमध्ये राहत असल्याने शरीरिक संबंध रोजच ठेवले जात होते. एकेदिवशी युवतीला आईची आठवण आली. यामुळे ती सूरजला न सांगला निघून गेली. यामुळे चिडलेल्या सूरजने तिला वीष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर सूरज तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तिला आपल्याच घरी ठेवत असल्याने दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवणे नित्याचेच झाले होते. मात्र, तरुणी आईला भेटायला गेली. याची कल्पना सूरजला नव्हती. त्याला संबंध ठेवता न आल्याने चवताळला होता. यातून त्याने युवतीला मारण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाची बातमी - सासूने हात पकडले, सासऱ्याने अंगावर रॉकेल शिंपडले, पती गळ्यावर वार करणार तोच...
सूरजसोबत राहत असलेली युवती आईची आठवण आल्याने भेटायला घरी गेली. युवतीला आईच्या घरी गेल्याचा जाब विचारत ठार मारण्याचा उद्देशाने तिच्या अंगावर बसून काळ्या लिक्वीडच्या बिषाची बॉटल तिच्या तोंडात ओतली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयित सूरज मुसळे याच्याविरुद्घ विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.