लक्झरी कारमधून करायचे गायींची चोरी, असा झाला टोळीचा पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

भांडे ले-आउटमध्ये राहणारे दिनेश भांगे यांच्या गोठ्यात जर्सी गाय बांधली होती. गेल्या वर्षी 15 डिसेंबरला पहाटे साडेतीन वाजता चोरट्यांची टोळी तेथे आली. त्यांनी गोठ्यातील गर्भवती असलेली गाय कारमध्ये कोंबली आणि निघून गेले. त्यांच्या गोठ्याच्या समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गायी चोरीची घटना कैद झाली.

नागपूर : मध्यरात्रीच्या सुमारास शहरात फिरून गायींना कारमध्ये कोंबून चोरून नेणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने चोरट्यांच्या टोळीचा सुगावा लागला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडे ले-आउटमध्ये राहणारे दिनेश भांगे यांच्या गोठ्यात जर्सी गाय बांधली होती. गेल्या वर्षी 15 डिसेंबरला पहाटे साडेतीन वाजता चोरट्यांची टोळी तेथे आली. त्यांनी गोठ्यातील गर्भवती असलेली गाय कारमध्ये कोंबली आणि निघून गेले. त्यांच्या गोठ्याच्या समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गायी चोरीची घटना कैद झाली.

सीसीटीव्हीमुळे चोरी उघडकीस
या प्रकरणाची तक्रार भांगे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली. पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. ते फुटेज सक्‍करदरा पोलिसांना पाठवले. सक्‍करदरा आणि एमआयडीसीच्या पथकाने फुटेजवरून शनिवारी आरोपी अब्दुल एहफाज (वय 22) आणि त्याचा साथीदार शेख मजहर (वय 24) गौसिया कॉलनी, मोठा ताजबाग यांना ताब्यात घेतले.

नितीन गडकरींच्या ड्रिम प्रोजेक्‍टला का लागला ब्रेक?

या आरोपींनी गाय चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना खाक्‍या दाखवताच अन्य आरोपी अब्दूल अजीम आणि शेख सानू यांना अटक केली. अन्य आरोपी शेख शाकीर ऊर्फ मोनू फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई एमआयडीसीचे ठाणेदार हेमंत खराबे यांच्या डीबी पथकातील रमेश हत्तीगोट, एएसआय अरविंद राठोड, हवालदार विनायक मुंडे, पवन सिरसाट यांनी केली. 

प्राध्यापिकेला जाळणा-यावर दोन आठवड्यात दोषारोपपत्र, पीडितेची प्रकृती नाजूक

तासाभरात गायीची कत्तल 
आरोपींची टोळी शहरातील मोकाट गाय किंवा गोठ्यात बांधलेली गाय कारमध्ये कोंबून चोरायचे. तासाभरात एका पडक्‍या घरात नेऊन कत्तल करण्यात येत होती. गायींचे हाड आणि अन्य अवयवांची लगेच विल्हेवाट लावली जायची. ही टोळी एवढी क्रूर आहे की गर्भवती गायींचीसुद्धा कत्तल करायचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: street cattle Theft racket exposed in nagpur