प्राध्यापिकेला जाळणा-यावर दोन आठवड्यात दोषारोपपत्र, पीडितेची प्रकृती नाजूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

वर्धा : हिंगणघाट येथील जळीत प्रकरणात आरोपी विकेश नगराळे (रा. दारोडा) याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून येत्या दोन आठवड्यात पोलिस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

वर्धा : हिंगणघाट येथील जळीत प्रकरणात आरोपी विकेश नगराळे (रा. दारोडा) याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून येत्या दोन आठवड्यात पोलिस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

प्रकरणातील आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात नागरिकांच्या भावना संतप्त असल्याने पोलिसांकडून आरोपीला रात्रीच न्यायालयात हजर करून त्याची पोलिस कोठडी अबाधित ठेवून त्याची रवानगी कारागृहात केली आहे. यात पोलिसांनी आतापर्यंत पुराव्यांच्या नावावर आरोपीकडून पेट्रोल आणण्याकरिता वापरलेली शिशी, जाळण्यासाठी वापरलेला टेंभा आणि त्याची दुचाकी व इतर काही साहित्य जप्त केले आहे. या आरोपीला शिक्षा होण्यासाठी हे पुरावे कामी येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

लक्ष पीडितेच्या प्रकृतीकडे 
या प्रकरणातील पीडितेवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असली तरी धोक्‍याबाहेर नसल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे तिच्या प्रकृतीकडे जिल्हावासींचे लक्ष लागले आहे. 

अभिनेत्री रविना टंडन, फराह खान जोरजोरात हसल्या अन्‌ गुन्हा दाखल

मोर्चे निवेदन सुरूच 
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणात नागरिकांचा आक्रोश कायमच आहे. यात रविवारी (ता. नऊ) पीडिता आणि आरोपीच्या दारोडा गावातील ज्येष्ठ नागरिकासह युवकांनी मुंडन आंदोलन केले. विशेष म्हणजे यात आरोपीच्या मित्राचा सहभाग होता. तर वर्ध्यात काही युवकांनी एक दिवसाचे आत्मक्‍लेष आंदोलन केले. 

पीडितेवर पुन्हा शस्त्रक्रिया, रक्तदाबात चढ-उतार
पीडितेच्या रक्तदाबात आज चढ-उतार नोंदवण्यात आला. त्यामुळे डॉक्‍टरांनी औषधांमध्ये काही प्रमाणात बदल केले आहेत. तिच्यावर सकाळी चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली. रक्तही दिले गेले. आता तिची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिली. 

अरेच्च्या! हा बाबा तर निघाला चार बायकांचा दादला, आता पळवली पाचवी

पीडितेवर उपचाराचा आज सातवा दिवस आहे. सकाळी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, तिच्या शरीरातील जखमा स्वच्छ करण्यात आल्या. त्यानंतर मलमपट्टी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत तिचा रक्तदाब कमी-जास्त होत आहे. त्यामुळे औषधांमध्ये बदल करण्यात आले. तिच्या शरीरात रक्ताची कमी असल्याचे लक्षात आल्याने दुपारी रक्त देण्यात आले. जंतुसंसर्गाची तपासणी करत त्याच्याही औषधांमध्ये बदल केले. तिच्या रक्तात ऑक्‍सिजनची मात्र खालावल्याचे पुढे आले. सध्या ती कृत्रिम श्‍वसन यंत्रणेवर असून तिची प्रकृती गंभीर आहे. 

पीडित स्वतः श्‍वास घेत नाही तोपर्यंत तिला कृत्रिम श्‍वसन यंत्रणेवर ठेवण्यात येईल. तिला नाकावाटे टाकलेल्या नळीतून द्रव्यरूप जेवण दिले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीडितेने सलग एक ते दीड महिने उपचाराला असा सकारात्मक प्रतिसाद दिल्यास तिच्यात बरेच सुधार दिसण्याचे संकेत डॉ. रेवनवार यांनी दिले. रविवारी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन पीडितेसह तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. डॉक्‍टरांसोबत वैद्यकीय स्थितीची चर्चाही केली. पीडितेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेला येथील भूलतज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे आणि डॉ. विद्या नायर यांची उपस्थिती होती.

भाऊ समजून बांधत होती राखी नंतर केले बंद, मग सुरू झाला त्रास...

प्रकृती नाजूक 
पीडितेची प्रकृती नाजूक असल्याने आज ड्रेसिंग करण्यात येणार नाही. स्टेबिलाईज करणे आवश्‍यक आहे. शुक्रवारी पोषण नलीका टाकल्याने जेवण देण्यास सुरुवात केली आहे. पीडित पूर्णपणे शुद्धीवर असून, डोळे उघडले आहेत. दृष्टी पूर्णपणे असल्याची माहिती डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police to file chargesheet against accused of hinganghat case