Video : मुलांशी केली मैत्री म्हणून घरच्यांनी बंद केले शिक्षण, सावित्रीच्या लेकींचा संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त "Me सावित्री' उत्सवाचे आयोजन "व्ही 4 चेंज' संघटनेतर्फे फुटाळा तलाव येथे केले होते. यात विविध क्षेत्रांत आणि विविध बाबतीत दिलेला लढा महिलांनी उपस्थितांसमोर कथन केला. स्त्रीला जीवनात संघर्ष केल्याशिवाय जगता येत नाही, पुढे जाता येत नाही. तिच्या दिसण्यावरून, तिला कमकुवत समजण्यावरून, शिक्षण, नोकरी, छंदांसाठी घरातून बाहेर पडण्यासाठी तिला बरेचदा आप्तस्वकीय, समाजाशी लढावे लागते.

नागपूर : रुचिता वाळके महाविद्यालयीन युवती, बडोद्याला राहते. शालेय शिक्षण घेताना मुलांशी मैत्री केली म्हणून घरच्यांनी तिचे शिक्षण बंद केले. पुढे शिकवायचेच नाही, असा निर्धार करून तिला घरात डांबले. परंतु, कुटुंबातील सत्तर वर्षांची आजी रुचितासाठी सावित्री बनली. तिने पुढाकार घेत रुचिताला नागपूरला महाविद्यालयीन प्रवेश घ्यायला पाठवले. आज रुचिता एम. ए. इंग्लिशच्या शेवटच्या वर्षाला आहे, अशा एक ना अनेक कथा आज "मी सावित्री' कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आल्या.
 
कमी वयातच विधवा झाले.. पती गेल्यावर तीन मुलांची जबाबदारी अंगावर होती, कुटुंब, नातेवाईक सर्वांनी साथ सोडली. अशात एकटीने कष्ट करून मुलांना शिकवले, कुटुंबापुरते छोटेसे हक्काचे घरही झाले, मुलीचे लग्न करून. दिले आता मुले नोकरीवर आहेत. त्यांचे लग्नही झाले. नव्याने आलेल्या सुनेला वेगळा घरोबा हवाय... कष्टाने उभारलेल्या घराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी गीताताईंचा संघर्ष सुरू आहे.

अंकिता कावळेला तर कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक या तिन्ही पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. शरीरयष्टीने लठ्ठ असल्याने, बॉडी शेमिंगचा प्रकार अंकितासोबत वारंवार होत आहे. घरच्यांना माझ्या लग्नाची चिंता आहे. तर घराबाहेर शरीरावर होत असलेल्या कमेंटचा सामना अंकिताला रोज करावा लागतो. अशा एक ना अनेक समस्या "मी सावित्री'च्या निमित्ताने समोर आल्या.

क्लिक करा - मुसळधार पाऊस, थंडी अन्‌ ते चौघे, वाचा काय झाले...

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त "Me सावित्री' उत्सवाचे आयोजन "व्ही 4 चेंज' संघटनेतर्फे फुटाळा तलाव येथे केले होते. यात विविध क्षेत्रांत आणि विविध बाबतीत दिलेला लढा महिलांनी उपस्थितांसमोर कथन केला. स्त्रीला जीवनात संघर्ष केल्याशिवाय जगता येत नाही, पुढे जाता येत नाही. तिच्या दिसण्यावरून, तिला कमकुवत समजण्यावरून, शिक्षण, नोकरी, छंदांसाठी घरातून बाहेर पडण्यासाठी तिला बरेचदा आप्तस्वकीय, समाजाशी लढावे लागते.

हा संघर्ष छोटा असो की मोठा, महिला रोज आपल्या स्तरावर हा संघर्ष करीत असतात. "व्ही 4 चेंज' संघटनेच्या स्नेहल वानखेडे, रश्‍मी पारसकर, योगिता भिवापूरकर, अलका वेखंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रश्‍मी मदनकर यांनी युवकांना केवळ स्वतःपुरते जगू नका, इतरांसाठी जगा, इतरांसाठी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळणारे समाधान शाश्‍वत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पावसाचे पाणी शिरले पाईपमध्ये अन्‌ बाहेर आले हे...
 

छोटी सावित्री ठरली लक्षवेधी
शहरातील दर्शना चावरे आणि जितेशा चावरे या दाम्पत्यांनी आपल्या मुलीचे नाव सावित्री ठेवले आहे. सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या कार्याची आठवण सतत स्मरणात राहावी यासाठी आपल्या मुलीचे नाव सावित्री ठेवल्याचे दर्शना यांनी सांगितले. परंतु, मुलीचे इतके जुन्या पद्धतीचे नाव का ठेवले, असा प्रश्‍न जेव्हा लोक विचारतात तेव्हा त्याच्या बुद्धीची कीव येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: struggle of womens in indian society