शिष्यवृत्तीचे पैसे केंद्राने दिले पण राज्याने नाही, हजारो विद्यार्थ्यांची मॅट्रिकपूर्व स्कॉलरशीप रखडली

student not get scholarship yet nagpur news
student not get scholarship yet nagpur news
Updated on

नागपूर : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. आंबेडकर मॅट्रिकपू्र्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली. अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना दीड हजार तर भटक्या व विमुक्त जातीमधील विद्यार्थ्यांना हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. यासाठी केंद्र सरकारने निधी दिला. पण राज्य सरकारने अजूनही निधी दिला नसल्याचे समोर आले आहे. परिणामी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. 

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दीड हजार, तर भटक्या व विमुक्त जातींमधील विद्यार्थ्यांना हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी २१ कोटी ३८ लाखाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आपल्या वाट्याचे १० कोटी ३० लाख रुपये राज्य सरकारकडे दिला. राज्य सरकारने आपला १० कोटी ३० लाखाचा वाटा देणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप राज्याने निधीच दिला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे, राज्याच्या ओबीसी मंत्रालयाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, या प्रस्तावाबाबत वित्त मंत्रालयाने कुठलाच निर्णय घेतला नसल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. 

जातीच्या दाखल्याची अट - 
यापूर्वी केवळ उत्पन्नाचा दाखला अनिवार्य करण्यात आला होता. मात्र, यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांचे आणि वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र देण्याची अट टाकण्यात आली. बहुतांश विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले नाहीत. त्यामुळे गावाखेड्यात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि भटक्या व विमुक्त समाजातील लाखो कुटुंबीयांनी आपली दिवसाची रोजी सोडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात रांगा लावणे सुरू केले. अद्याप केवळ ५० टक्के पालकांनी यासाठी अर्ज केले आहेत. 

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची अट नकोच - 
यापूर्वी प्रवेशासाठी केवळ उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असताना, आता विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला मागण्याची गरज नाही. त्यामुळे ही अट तत्काळ रद्द करावी. याशिवाय सरसकट जात प्रमाणपत्राची अट रद्द करुन शेतकरी कुटुंबातील व रोजंदारीवर जाणाऱ्या गरीब पालकांना दिलासा देण्याची मागणी स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया(SRAI- स्राई)चे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com