Video : भला मोठा "पिरिऑडिक टेबल' पहिला का?

periodic table nagpur
periodic table nagpur

नागपूर : विद्यार्थ्यांना रासायनिक मूलद्रव्यांचा परिचय व्हावा, जगातील प्रत्येक गोष्ट कोणत्या मूलद्रव्यापासून निर्माण झाली, हे कळावे. यासाठी मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलने विज्ञान प्रदर्शनात भला मोठा पिडिऑडिक टेबल तयार केला आहे. शाळेतील पाचवी ते दहावीच्या तब्बल 236 विद्यार्थ्यांनी हा टेबल तयार करण्यात योगदान दिले असून, यातून मूळ वैज्ञानिक घटकांची माहिती देण्यात आली.

वैज्ञानिक मूळ घटकांच्या नियतकालिक सारणीला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली. याच औचित्याने विद्यार्थ्यांच्या मनातील रासायनिक सूत्रांची क्‍लिष्टता दूर व्हावी यासाठी हा पिडिऑडिक टेबल तयार करण्यात आला आहे. दी ब्लाइंड रिलिफ असोसिएशनद्वारे संचालित मुंडले शाळेच्या प्रांगणात आयोजित या कला, हस्तकला, विज्ञान व गणित प्रदर्शनाचे महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या सोहळ्याला व्हीएनआयटीच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अनुपमा कुमार व दी ब्लाइंड रिलीफ असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे उपस्थित होते.

हेही वाचा - आता चिअर्सला नोंद लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध

नियतकालीन सारणीतील 118 घटकांचे प्रत्यक्ष पटांगणावर अत्यंत सुंदर प्रतिकृती उभारण्यात आली असून, मानवी जीवनातील घटकतत्त्वांचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत उलघडून दाखवले जात आहे. नियतकालिक सारणी प्रत्येकाला समजेल अशा सोप्या रीतीने येथे विद्यार्थ्यांनी मांडली असून, प्रत्येक नियतकालिक घटकाचे चिन्ह, त्या घटकाचे पूर्ण नाव, त्याचे अणू संख्या व ती कोणकोणत्या ठिकाणी असते त्याची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक नियतकालिक सारणीतील घटकांची माहिती विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सांगत होते.

पीरिऑडिक टेबलचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इयत्ता दहावीत प्रवेश होत असला तरी, तो समजून घेणे हे एकप्रकारचे अवघड असते. म्हणून कमी वयापासून त्याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी. सोप्या रीतीने तो समजावा, मुलांनी त्यामध्ये अधिकाधिक रस घ्यावा हा आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com