esakal | ‘नीट'चे वेळापत्रक कधी? विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; पालकांमध्येही संभ्रम 

बोलून बातमी शोधा

neet}

दरवर्षी देशातील १५५ शहरात लाखो विद्यार्थी ‘नीट' देत असतात. यामध्ये मागल्या वर्षी नागपुरातून २५ हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, मागल्या वर्षी नीट आणि जेईई मेन्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात.

‘नीट'चे वेळापत्रक कधी? विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; पालकांमध्येही संभ्रम 
sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (एनटीए) वतीने आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशासाठी शनिवारी पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेण्यात आली. मात्र अद्याप वैद्यकीय प्रवेशासाठी ‘एनटीए‘ द्वारे ‘नॅशनल इलिजिबिलीटी एन्टरन्स टेस्ट' (नीट) परीक्षेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 'नीट'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही संभ्रमात पडले आहेत.

दरवर्षी देशातील १५५ शहरात लाखो विद्यार्थी ‘नीट' देत असतात. यामध्ये मागल्या वर्षी नागपुरातून २५ हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, मागल्या वर्षी नीट आणि जेईई मेन्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. यंदा कोरोनामुळे बारावीच्या सर्वच बोर्डाच्या परीक्षा उशिरा होत घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे ‘नीट' परीक्षा देखील उशिरा होणार का? परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन याबाबत देखील अनेक प्रश्न पालकांना पडले आहेत.

गृहिणींनो, महिना संपतोय तेल जरा जपून वापरा; खाद्य तेल...

विशेष म्हणजे, एनटीएद्वारे जेईई मेन्सची परीक्षा २०२१ या वर्षामध्ये चार वेळा घेण्याचे नियोजन केले आहे. ही परीक्षा २३ फेब्रुवारी ते २८ मेदरम्यान चार टप्प्यात घेण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा आता पार पडला आहे. मात्र,'नीट'परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'एनटीए'ने कुठलेही नोटीफीकेशन जाहीर केलेले नाही.

नियोजन कसे करणार ?

किती विद्यार्थी नीट परीक्षा देणार हे सुद्धा गुलदस्त्यात असल्याने परीक्षा संदर्भातील गोष्टींचं नियोजन कधी व कसे होणार असाही प्रश्न समोर आला आहे. ‘नीट' वेळेवर आयोजित करण्यासाठी येत्या काळात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे काय व्यवस्था करण्यात येईल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

गृह विभागाकडूनच पोलिसांवर अन्याय; जुन्याच आदेशाने...

एनटीएद्वारे`नीट' च्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे कोरोना असल्याने याही वर्षी परीक्षा लांबते काय? हा प्रश्न आहे.
सुरज अय्यर, व्यवस्थापकीय संचालक,
इनसाईट कोचिंग क्लासेस. 

संपादन - अथर्व महांकाळ