
गेल्या दोन आठवड्यापासून शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मृत्यूसंख्याही वाढल्याने शहरात काही दिवसाची टाळेबंदी करावी असा विचार समोर येत आहे.
नागपूर : कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे लाखोंचे रोजगार गेलेत. याशिवाय स्पर्धातम परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बराच परिणाम झाला आहे. अनेक दिवसांनंतर १९ आणि २० सप्टेंबरला ‘आयबीपीएस आरआरबी‘ ची परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, याच दिवशी महानगरपालिकेने जनता कर्फ्यु लावल्याने परीक्षा द्यायची कशी हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मृत्यूसंख्याही वाढल्याने शहरात काही दिवसाची टाळेबंदी करावी असा विचार समोर येत आहे. पालकमंत्र्यांनी याला नकार दिला तरी महापालिकेकडून खबरदारी म्हणून जनता कर्फ्यु लावण्याबाबत विचार करण्यात येत होता. आज महापौर संदीप जोशी यांनी 19 आणि 20 तारखेला जनता कर्फ्यु जाहीर केला.
मात्र, 19,20 आणि 23 तारखेला रिजनल रुरल बॅंकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत ‘ऑफिस असिस्टंट' पदाकरिता परीक्षा घेण्यात येणार आहे. या मध्ये नागपुरात अनेक परीक्षा केंद्रे विद्यार्थांना देण्यात आहे आहेत. नागपुरात वाडी, बेलतरोडी आणि हिंगणा येथे परीक्षा केंद्रे आहेत. शहरातील असंख्य विद्यार्थी ही परीक्षा देणार असून जनता कर्फ्यु असल्याने परीक्षेला जायचे कसे ? असा प्रश्न विद्यार्थांना पडला आहे.
जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या
विशेष म्हणजे नागपुरातील जवळील गावावरील स्पर्धात्मक परिक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षेकरिता नागपूरला येतात. जनता कर्फ्यु मुळे या सर्व विद्यार्थांची गैरसोय होवु शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देत येणे शक्य होणार नाही. याप्रकारे विद्यार्थ्यांची रोजगाराची संधी हुकण्याची भिती आहे.
महापालिकेने सोय करावी
जनता कर्फ्युमुळे शहरात वाहतुक बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. अनेक दिवसानंतर विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा देता येणे शक्य झाले आहे. मात्र, या परीक्षेला विद्यार्थी मुकल्यास त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासने योग्य ती सोय करुन विद्यार्थांना परीक्षा केंद्रापर्यत पोचविण्याची सोय करावी अशी मागणी डाँ. राममनोहर लोहिया वाचनालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी सुबोध चहांदे यांनी केली आहे.