
धानाचे उत्पादन घटल्याने तांदळाच्या भावात प्रति किलो दहा रुपयांची वाढ झालेली आहे. एचएमटी ४ हजार, श्रीराम तांदूळ साडेचार हजार ते पाच हजार २०० रुपयांवरून प्रति क्विंटल तर चिन्नोर साडेपाच ते ५ हजार सातशे रुपयांवर पोहोचला आहे.
नागपूर : भारतात साखरेचे उत्पादन वाढल्याने भाव प्रति किलो एक रुपयाने घसरले. साखर प्रति किलो ३५ रुपयांवरून ३३ ते ३४ रुपयांवर आलेली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यात वाढणार असल्याने साखरेला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, तांदूळ वाढलेल्या स्थितीत तर तूर, हरभरा डाळ व खाद्य तेलाचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
भारतातील ७० टक्के खाद्य तेल विदेशातून आयात केले जाते. तर ३० टक्के उत्पादन देशातच केले जाते. यंदा कोरोनामुळे खाद्य तेलाची आयात करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने पाम तेलावर आयात शुल्कातही वाढ केली आहे. भारतात सोयाबीन पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम तेल उत्पादनालाही झालेला आहे. किरकोळ बाजारात सोयाबीन तेल १३५ ते १४० रुपये किलो तर शेंगदाणा तेल १६० ते १७० रुपये किलोवर स्थिरावलेले आहे.
धानाचे उत्पादन घटल्याने तांदळाच्या भावात प्रति किलो दहा रुपयांची वाढ झालेली आहे. एचएमटी ४ हजार, श्रीराम तांदूळ साडेचार हजार ते पाच हजार २०० रुपयांवरून प्रति क्विंटल तर चिन्नोर साडेपाच ते ५ हजार सातशे रुपयांवर पोहोचला आहे.
सर्वच डाळींच्या किमती स्थिरावलेल्या आहेत. ब्राझील, भारत, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार प्रमुख साखर उत्पादक देश आहेत. थायलंडमध्ये उसाचे उत्पादन घटले आहे. युरोपियन युनियनमध्येही तशीच स्थिती आहे.
जाणून घ्या - (Video) Bhandara Hospital fire news : दोनदा पडलो पण पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले
ब्राझीलमध्ये यंदा ऊस कमी असल्याने साखर उत्पादन घटणार आहे. उलट, भारतात अतिरिक्त साखर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे दर २७०० रुपये क्विंटलच्या आसपास आहेत. केंद्र सरकारकडून निर्यात अनुदानाची प्रति टन ६००० रुपये मिळणारी रक्कम विचारात घेता निर्यात साखरेला प्रति टन सुमारे ३३०० रुपये भाव मिळत आहे. हा भाव वाढत राहण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने अनुदानात वाढ केलेली आहे.
संपादन - नीलेश डाखोरे