व्यवसायात आलेल्या तणावामुळे विवाहितेची आत्महत्या 

अनिल कांबळे
Thursday, 15 October 2020

प्रियंका उच्चशिक्षित असून त्यांचा विवाह मंगेश यांच्याशी झाला होता. त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे. त्या गेल्या काही महिन्यांपासून विदेशातील कंपनीशी जुळल्या होत्या. फार्मसीची ऑनलाईन व्यवसाय त्या करीत होत्या.

नागपूर  ः विदेशात करीत असलेल्या ऑनलाईन बिजनेसमध्ये काम करीत असताना आलेल्या तणावामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रियंका मंगेश राऊत (३२, ग्राम तुकोबा, बिडीपेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

सक्करदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका उच्चशिक्षित असून त्यांचा विवाह मंगेश यांच्याशी झाला होता. त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे. त्या गेल्या काही महिन्यांपासून विदेशातील कंपनीशी जुळल्या होत्या. फार्मसीची ऑनलाईन व्यवसाय त्या करीत होत्या. रात्री दोन वाजेपर्यंत त्या लॅपटॉपवर काम करीत होत्या. 

ठळक बातमी - मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल
 

बुधवारी त्या पतीसह फिरायला बाहेर गेल्या होत्या. रात्री सर्वांनी जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या रात्री बरा वाजताच्या सुमारात लॅपटॉपवर काम करीत होत्या. तर पती आणि मुलगी दुसऱ्या रूममध्ये झोपले होते. रात्री तीन वाजताच्या सुमारास मुलगी रडायला लागल्यामुळे मंगेश यांना जाग आली. ते मुलीला घेऊन लगेच पत्नीच्या रूमकडे गेले. दरवाजा उघडला असता प्रियंकाने मुलीसाठी बांधलेल्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. 

त्यांनी लगेच आईला झोपेतून उठवले तसेच पोलिसांना फोन केला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रियंका यांनी कामाच्या टेंशनमुळे आत्महत्या केली असावी, अशी शक्यता असल्याची माहिती दिली. 
 

लुटमार करणाऱ्या युवकाची धुलाई

रस्त्याने पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीची बॅग हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नात अललेल्या युवकाची नागरिकांनी चांगली धुलाई केली. ही घटना बुधवारी दुपारी रामनगर चौकाजवळील जीबी हॉस्पिटलसमोर घडली. अमित ढोक असे अटकेतील लुटारूचे तर मानसी संजय ढोमणे (वय २१, रा. अंबाझरी टेकडी) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी दुपारी मानसी ही कॉलेजमधून पायी घरी जात होती. जीबी हॉस्पिटलसमोर अमित याने मानसीच्या खांद्याला लटकविलेली बॅग हिसकावली. मानसीने बॅग घट्ट पकडली. ती खाली पडली. सुमारे दहा फुट अंतरापर्यंत अमित त्याने तिला फरफटत नेले. बॅग हिसकावली. मानसीने नातेवाइकाच्या मोबाइलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नातेवाइक तेथे पोहोचले. काही नातेवाइकांनी लुटारूचा शोध घेतला. रामनगर परिसरात अमित हा बॅगमधून पैसे काढताना दिसला. नातेवाइकांनी त्याला पकडले. नागरिक जमले. नागरिकांनी अमित याला चांगलाच चोप दिला.

संपादित - अतुल मांगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a married woman due to work tension