२००६ अन् यंदाच्या बर्ड फ्ल्यूमध्ये फरक, चिकन अन् अंडी खाण्याबाबत पशूसंवर्धन मंत्र्यांचा महत्वाचा सल्ला

टीम ई सकाळ
Monday, 11 January 2021

ठाणे, दापोली, परभणी आणि नागपूर येथील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी फक्त परभणीचा तपासणी अहवाल समोर आला आहे. अन्य ठिकाणच्या नमुन्याचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्याचेही केदार म्हणाले.

नागपूर : अंडी किंवा कोंबड्यांना विशिष्ट तापमानावर अर्धातास शिजविले, तर त्यामधी जीवाणू मरतात. त्यामुळे राज्यातील जनेतेने, अंडी आणि चिकन ७० डिग्री तापमानावर शिजविले पाहिजे. असे केल्यास त्यामधील जीवाणू मरतील आणि ते आरोग्यासाठी सुरक्षित देखील राहील, असे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार म्हणाले. आज ते नागपुरात बोलत होते.

हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

ठाणे, दापोली, परभणी आणि नागपूर येथील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी फक्त परभणीचा तपासणी अहवाल समोर आला आहे. अन्य ठिकाणच्या नमुन्याचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्याचेही केदार म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर राज्यातील बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले. तसेच कुठेही पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्यास त्याचे अहवाल आम्ही घेणार आहोत. त्यासाठी उपाययोजना करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

या महाराष्ट्राने अशाप्रकारचा कहर २००६ मध्ये पाहिला आहे. त्यावेळी राज्य शासनाने केंद्र शासनाची वाट न पाहता पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा हात दिला होता. यंदाही राज्य शासनाची तीच भूमिका राहिल, असेही केदार म्हणाले. मोठे पिट्स खोदतो. त्यामध्ये औषधे टाकून कोंबड्या टाकतो. तेच आपण यावेळीही करणार आहोत. मात्र, पोल्ट्री धारकांनी आम्हाला याबाबत माहिती द्यावी. २००६ मध्ये आलेला बर्ड फ्लू आणि यंदाच्या बर्ड फ्लूमध्ये फरक आहे. यंदा कोरोनाचेही संकट आहे. त्यामुळे सर्वांनी शासनाला माहिती द्यावी, असेही केदार म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil kedar reaction on bird flu situation in nagpur