236 वाघिणींसह धावली "सुपर पायथन', लांबी पाहून सारेच अवाक्‌

Super Python train run with 236 coaches
Super Python train run with 236 coaches

नागपूर : मालगाडीला किती डबे असतात?, असा प्रश्‍न कुणी विचारला तर आपण अधिकाधिक नव्वद -शंभरपर्यंत पोहोचू शकतो. पण, तब्बल 236 वाघिणींसह (डबे) मालगाडी यशस्वीरीत्या चालविण्यात आली. ही किमया करून दाखविली आहे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने. एकूण 2.8 किमीची ही मालगाडी "शेषनाग' नावाने चालवून विभागाने नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

ही सुपर पायथन गुरुवारी नागपूर विभागातील परमालकसा ते दुर्गदरम्यान एकूण 35 ते 40 किमीचे अंतर यशस्वीरीत्या धावून गेली. एकूण चार गाड्या एकत्र जोडून ही मालगाडी तयार करण्यात आली होती. त्यात 236 डबे, चार ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत लोकोचा समावेश होता. भारतीय रेल्वेत अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता. गुरुवारी दुपारी 12.20 वाजता ही गाडी परमालकसा येथून रवाना झाली आणि 63 किमी प्रतितास वेगाने धावत अगदी 45 मिनिटांमध्ये म्हणजेच दुपारी 1.05 वाजता दुर्गला पोहोचली.

एरवी रिकामी मालगाडी सरासरी 25 ते 30 किमी प्रतितास वेगाने धावते. सुपर पायथन त्यापेक्षा अधिक वेगात धावली. ही मालगाडी पुढे बिलासपूर आणि तिथून पुढे कोरबा स्थानकापर्यंत चालविली जाणार आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वात ही मालगाडी चालविण्याचा निर्णय घेऊन त्यादृष्टीने आवश्‍यक नियोजन करण्यात आले. भारतीय रेल्वेत एवढ्या प्रदीर्घ लांबीची ट्रेन चालविण्यात आल्याची ही पहिलीच नोंद ठरली. नागपूर विभागात मालगाड्यांचा सरासरी वेग वाढविण्यात मोठे यश मिळाले आहे. अलीकडच्या काळात विभागातून धावणाऱ्या मालगाड्यांची गती सरासरी 50 ते 60 किमी प्रतितासावरून तब्बल 80 किमी प्रतितास नोंदविली जाऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com