esakal | अल्पवयीन दिव्यांग विद्यार्थिनीवर अत्याचार आणि गर्भपात करून गर्भ जमिनीत पुरला...

बोलून बातमी शोधा

Superintendent sexually abuses a minor disabled student

होळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलगी घरी आली असता, तिची मासिक पाळी थांबल्याचे आईच्या लक्षात आले. तिने मुलीला विचारणा केली असता, मुलीने आपबीती सांगितली. तेव्हा आईने तातडीने ही गोष्ट विश्वासातील एका महिलेला सांगितली. तिने अर्जुननगर येथील थूल ले-आउटमधील खासगी रुग्णालयातील परिचारिकेची माहिती दिली. त्यानुसार, मुलीची आई मुलीला घेऊन परिचारिकेला भेटली. त्या ठिकाणी 20 हजार रुपये घेऊन गर्भपात करण्याचे ठरले.

अल्पवयीन दिव्यांग विद्यार्थिनीवर अत्याचार आणि गर्भपात करून गर्भ जमिनीत पुरला...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि.नागपूर) : एका अल्पवयीन दिव्यांग विद्यार्थिनीवर अधीक्षकाने
अत्याचार घटना उघडकीस आली. एवढेच नव्हे, तर तिचा गर्भपात करून गर्भ जमिनीत
पुरविला. यात आरोपीला मुलीच्या आईने व एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिकेने सहकार्य केले. काटोल शहरातील एका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी एका विद्यालयात सहावीत शिकते. त्याच ठिकाणी वसतिगृहात ती राहत होती.

अशी घडली माणूसकीला लाजविणारी घटना
वसतिगृहाचा अधीक्षक म्हणून राजेंद्र काळबांडे (वय 44, पिंपळगाव वखाजी) हा कामावर आहे. या अधीक्षकाने शाळेतील मतिमंद विद्यार्थिनीचे फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान लैंगिक शोषण केले. होळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलगी घरी आली असता, तिची मासिक पाळी थांबल्याचे आईच्या लक्षात आले. तिने मुलीला विचारणा केली असता, मुलीने आपबीती सांगितली. तेव्हा आईने तातडीने ही गोष्ट विश्वासातील एका महिलेला सांगितली. तिने अर्जुननगर येथील थूल ले-आउटमधील खासगी रुग्णालयातील परिचारिकेची माहिती दिली.

हेही वाचा : भयंकर ! पब्जीचा स्कोअर न झाल्याने नागपुरातील युवकाने घेतला गळफास

नुसार, मुलीची आई मुलीला घेऊन परिचारिकेला भेटली. त्या ठिकाणी 20 हजार रुपये घेऊन गर्भपात करण्याचे ठरले. तेव्हा मुलीच्या नावाने असलेल्या सहा हजार रुपयांच्या दोन फिक्‍स डिपॉझिट तोडून 12 हजार व इतर ठिकाणांहून बाकीची रक्कम गोळा केली. ती सिंधूला दिली तेव्हा सिंधूने पीडित मुलीला दोन गोळ्या व इंजेक्‍शन दिले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलीचा गर्भपात झाला. ही माहिती मुलीच्या आईने सिंधूला दिली. तेव्हा 15 मेच्या दरम्यान सिंधू पीडित मुलीच्या घरी पोहोचली व हातमोजे घालून काढलेला गर्भ एका प्लॅस्टिक पिशवीत घालून जवळच्या एका शेतातील धुऱ्यालगत जमिनीत पुरून त्यावर दगड ठेवला.

हे नक्‍कीच वाचा : कोरोनातून सावरलेल्या नागपूरच्या या व्यक्‍तीने केले "प्लाझमा' दान

पोलिसांनी लावला छडा
घरी परत येऊन कुठेही वाच्यता होणार नाही, याची काळजी घेतली. पोलिसांच्या
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काटोल पोलिसांनी तपास सुरू केला. एकेक धागा गोळा करून माहिती गोळा केली. मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून विविध सहकलमाखाली व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये व बाललैंगिक शोषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अधीक्षक राजेंद्र काळबांडे याला अटक केली. संगनमत करून पुरावा नष्ट केला म्हणून मुलीची आई व परिचारिका सिंधू डेहनकर या दोघींनासुद्धा अटक करण्यात आली. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव व काटोल पोलिस करीत आहेत.

हेही वाचा : परीक्षा घेताय मग, एक कोटींचा विमा काढा

माता न तू वैरिणी...
आरोपीने मुलीच्या आईलादेखील धमकावून पीडितेचा गर्भपात करून घेण्यासाठी दबाव टाकला. मुलीच्या आईला आर्थिक मदत देण्याचे आमिष देत आरोपी राजेंद्र काळबांडे याने एका खासगी रुग्णालयात कधीकाळी काम केलेल्या एका परिचारिकेला सोबत घेऊन पीडित मुलीचा गर्भपात घडवून आणला. एवढेच नाही, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भ्रूण जमिनीत पुरले. ही बाब पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. परिचारिका आणि पीडित मुलीची आई या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राजेंद्र काळबांडेला अत्याचार आणि बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये अटक केली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.