esakal | मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक रात्री कर्तव्यावर गेला, अन्‌ सकाळी घडले हे अघटीत...
sakal

बोलून बातमी शोधा

file

आता सगळीकडे लॉकडाउन असल्याने शाळेला सुटी आहे. या बंगल्याच्या मागील बाजूस एक झाडाची राखण करणारा कर्मचारीसुद्धा वास्तव्यास आहे. सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावण्यासाठी रात्रपाळीच्या नोकरीला घरून निघाले. सकाळी चक्क त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक रात्री कर्तव्यावर गेला, अन्‌ सकाळी घडले हे अघटीत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


कामठी (जि.नागपूर) : छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील रात्रपाळीतील सुरक्षा कर्मचाऱ्याचा संदेशाहस्पद मृत्यू झाल्याने याबाबत वेगवेगळी चर्चा छावणी परिसरात होत आहे. ही घटना आज (ता. 21) सकाळी सातदरम्यान निदर्शनास आली. मृत सुरक्षारक्षकाचे नाव रमेश केशवराव भोतकर (वय 56, मोदी पडाव न्यू खलाशी लाइन कामठी) असे आहे.


अधिक वाचा  : मित्रहो,आनंदाचे क्षण टिपताना, दुःख कॅमेराबद्‌ध झाले !

गूढ कायम
सविस्तर वृत्त असे की, एक वर्षापूर्वीपर्यंत छावणी परिषदेचे कोणतेही मुख्य अधिकारी येथील माल रोडवरील बंगल्यात राहायचे. मात्र, जवळपास एक वर्षापूर्वी छावणी परिषद कामठी येथे रुजू झालेले अभिजित सानप हे नागपूर रोडवरील ऑरेंजसिटी येथे राहत असून, या ठिकाणी छावणी परिषदेची इंग्रजी माध्यमाची शाळा भरत असे. मात्र, आता सगळीकडे लॉकडाउन असल्याने शाळेला सुटी आहे. या बंगल्याच्या मागील बाजूस एक झाडाची राखण करणारा कर्मचारीसुद्धा वास्तव्यास आहे. सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावण्यासाठी रात्रपाळीच्या नोकरीला घरून निघाले. सकाळी चक्क त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच त्याच्या चेहऱ्यावर रक्ताने माखलेले डाग असून लाल रंगाच्या मुंग्यांनी चांगलाच चावा घेतला आहे.

अधिक वाचा  : काय हे, धान्य घेण्यासाठी बोलाविले म्हणून विद्यार्थी गेले, अन्‌ पुढे काय झाले, वाचा...


पोलिसांनी केला पंचनामा
मात्र, त्याच रात्री काय झाले, हे कळू शकले नाही. सकाळी त्या बंगल्याच्या मागील बाजूस राहणारा माळी उठला असता रमेश जमिनीवर पडून दिसला. त्याने लगेच अधिकारी अभिजित सानप यांना फोन करून सूचना दिली. सानप यांनी सामाजिक कार्यकर्ते कमल ऊर्फ लालू यादव यांना फोन करून पोलिस निरीक्षकाचा भ्रमणदूरध्वनी नंबर मागितला व घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी वरिष्ठांच्या आदेशान्वये मृत्यूचे मुख्य कारण कळणे तसेच मृताची कोरोनासंदर्भात असलेली संशयास्पद स्थितीसंदर्भात मृतदेह नागपूरच्या मेयो इस्पितळात पाठविण्यात आला आहे.

अधिक वाचा  : आम्हा पती-पत्नीचा घटस्फोट, आईने दुसरे लग्न केल्याने झाले असावे असे...

कारण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल
या सुरक्षारक्षकाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, मृताची परिस्थिती बघता कदाचीत हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला असावा किंवा त्याच्यावर कुणी अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला असावा, अशा विविध चर्चेला नागरिकांत उधाण आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याचे कारण वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळणार आहे. मृताच्या पाठीमागे आई, पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. मात्र, या घटनेने छावणी परिषद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 

go to top