तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

यापूर्वी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 30 जानेवारीपासून 12 फेब्रुवारीपर्यंत विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक व सेवाविषयी प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने वारंवार शासनाकडे निवेदने दिले पण शासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. 12 फेब्रुवारीपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेकडून सामूहिक रजा आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला होता.

नागपूर : तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍चभूमिवर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप व डी.एस.सी. तसेच कार्यालयाची चावी तहसीलदार यांच्याकडे सुर्पूद केली आहे.

अवश्य वाचा - जॉनी लिव्हर म्हणतात, नागपुरचे लोकं लय भारी!

यापूर्वी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 30 जानेवारीपासून 12 फेब्रुवारीपर्यंत विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक व सेवाविषयी प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने वारंवार शासनाकडे निवेदने दिले पण शासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. 12 फेब्रुवारीपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेकडून सामूहिक रजा आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला होता. जिल्ह्याच्या तेराही तालुक्‍यातून 400 वर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतल आहे. आज विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. काही मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. लेखी आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात येईल, असे संघटनेचे सचिव संजय अनवने यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या

साझा पुनर्रचनेनुसार नवनिर्मित तलाठी साझाची अंमलबजावणी करण्यात यावी. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप व प्रिंटर मिळावा. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत अश्‍वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचा 5 टक्के मेहनताना वेतनात मिळावा. तलाठी कार्यालयाचे प्रलंबित भाडे मिळावे. कोतवालांचे रिक्त पदे भरण्यात यावीत. निवडणुकीतील कामाचा अतिकालीक भत्ता मिळण्यात यावा. महसूल मंडळ अधिकारी यांना पीक कापणी प्रयोगाचे समप्रमाणात विभागणी करण्यात यावे आदी मागण्यांचा समोवश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi, a collective leave movement of board officers