
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर ): सर्वदृष्टीने गेल्या महिन्यापर्यंत सुरक्षित असलेला जिल्हा आता कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कामठी, कन्हान, काटोल, कोंढाळी आदी शहरांनतर आता हिंगणा तालुका संसर्गग्रस्त म्हणून कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. गुरूवारपर्यंत रूग्णसंख्या 75 इतकी आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आणखी वाचा : आरटीई प्रवेश : चुकीची कागदपत्रे देत असाल तर खबरदार
नीलडोहचे अमरनगर सर्वाधिक प्रभावित
वानाडोंगरीतील महाजनवाडी येथे आज दोन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळाले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या सध्या 75 झाली आहे. सतत वाढणा-या रुग्णसंख्येने जनतेत दहशत पसरली आहे. वानाडोंगरीतील साईराम चौकातील रुग्णांशी व अमरनगर येथील कोरोनाबाधित रुग्णांशी या रुग्णांचे "कनेक्शन' आहे. सुरुवातीला कोरोनाबधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.सर्वाधिक कोरोनाबाधीतांचे प्रमाण सध्या ग्रामपंचायत निलडोह अंतर्गतच्या अमरनगरातील आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी सांगितल्यानुसार एकूण 75 कोरोनाबाधीतांपैकी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 11 व्यक्ती उपचारानंतर आपल्या घरी परतले.
हेही वाचा : पारशिवनीत नळातून येते पिवळे पाणी, कोण खेळत आहे नागरिकांच्या जिवाशी
तालुका लॉकडाउनमध्ये
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे तालुक्यातील प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन विनाविलंब लावण्यात यावा, अशी मागणी आमदार समीर मेघे यांनी केली आहे. तालुक्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता तालुक्यातील एमआयडीसी परिसरसह सर्वच भागातील जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आजपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा आदेश हिंगणा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे यांनी काढला असून सर्व ग्रामपंचायतीला याबाबत सूचना देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.