महिलाच झाल्या महिलांच्या ‘टार्गेट’! चोरीसाठी आठवडी बाजाराचा वापर

सतीश दहाट
Monday, 16 November 2020

सर्वसाधारण महिलांसोबत या घटना घटतात. अशा चोरीच्या शिकार झालेल्या महिलांना घरी जाताच कुटुंबीयांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. बोटावर मोजण्या इतक्याच महिला पोलिसांकडे तक्रार करतात तर कित्येक महिला पोलिसांकडे तक्रार करतच नाही.

कामठी (जि. नागपूर) : येथील आठवडी बाजार अनेक वर्षांपासून शुक्रवारला भरत असतो. मात्र, या दिवशी बाहेर गावावरून बाजारात येणाऱ्या महिलांच्याच पर्स चोरी होत असल्याने बाजारात बाजार करण्यास आलेल्या महिला त्रस्त झालेल्या आहेत.

सविस्तर असे की, येथे दर दिवशी बाजार भरत असला तरी महत्वाचा आठवडी बाजार असतो. या आठवडी बाजारात शहरासह ग्रामीण भागातील रनाळा, येरखेडा, आजणी, गादा, गोराबाजार, सैनिक छावणी परिसरातील असंख्य नागरिक विशेषकरून महिला मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, या संधीचा लाभ घेण्यासाठी महिला चोर सर्वसाधारण महिलांवर डोळा ठेवून असतात.

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

चोरट्या महिला या कन्हान भागातील असल्याचे समजते. या महिला ग्रुपमध्ये बाजारात येत जरी असले तरी बाजारात प्रवेश करताच वेगवेगळ्या होऊन या महिला बाजारात येणाऱ्या महिलांचे लक्ष विचलित करीत जवळीक साधून आपली शिकार ठरवितात.

सर्वसाधारण महिलांसोबत या घटना घटतात. अशा चोरीच्या शिकार झालेल्या महिलांना घरी जाताच कुटुंबीयांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. बोटावर मोजण्या इतक्याच महिला पोलिसांकडे तक्रार करतात तर कित्येक महिला पोलिसांकडे तक्रार करतच नाही.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

येथील महिला आता पोलिसांकडे आशेने पाहताहेत. किमान बाजाराच्या दिवशी नव्याने रुजू झालेले जुनी कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय मालचे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना साध्या गणवेशात बाजारात पाळत ठेवण्याकरिता पाठवून बाजारात येणाऱ्या महिलांकडे लक्ष देऊन महिलांचे चोरी होणाऱ्या घटना थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Target women from female thieves