टीसीएसने स्थानिकांना रोजगार द्यावा; नितीन गडकरी यांची अधिकाऱ्यांना सूचना 

योगेश बरवड 
Saturday, 14 November 2020

टीसीएसच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख हर्षल गजघाटे आणि रेवती मुलमुले यांनी या विस्तार योजनेची माहिती  दिली. या योजनेमुळे आगामी काळात हजारो सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

नागपूर ः माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची आणि नावाजलेली कंपनी टीसीएसने आपली व्यवसायाची विस्तार योजना जारी केली असून आज केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांना अधिकाऱ्यांनी हजारो तरुणांना रोजगाराची संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

टीसीएसच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख हर्षल गजघाटे आणि रेवती मुलमुले यांनी या विस्तार योजनेची माहिती  दिली. या योजनेमुळे आगामी काळात हजारो सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रारंभी मिहान प्रकल्पात टीसीएस या कंपनीने ५० एकर जागा कंपनीने खरेदी करून आपला प्लांट सुरु केला आहे. 

आता आणखी ५० एकर जागा घेऊन एकूण १०३ एकर जागेवर काम सुरू आहे. नव्या विस्तार योजनेसाठी कंपनीने मोठी गुंतवणूक केली असल्याचेही गजघाटे यांनी ना. गडकरी यांना सांगितले. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना  गडकरी म्हणाले,  नागपुरात नियुक्त्या करताना स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे.  

सविस्तर वाचा - नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई 

नागपूरसह विदर्भात मोठ्या संख्येने सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयटी, बिगर आयटी क्षेत्रात तसेच व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नागपूरसह विदर्भातील युवकांना न्याय दिला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. टीसीएसची ही विस्तार योजना  तीन  वर्षात  पूर्ण होणार असून त्यात विदर्भातील युवकांना रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त टीसीएसच्या अधिकाऱ्यांनी केला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TCS should give jobs to local people said nitin gadkari