esakal | नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

NGA gives two hours for crackers

फटाक्‍याच्या दणदणाट व विषारी धूर यामुळे देशातील 122 अतिप्रदुषित शहरांमध्ये फटाके विक्रीसह वापरावर राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली आहे.

नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : राष्ट्रीय हरित लवादाने फटाके विक्री व आतषबाजीवर निर्बंध घातले आहेत. लवादाच्या आदेशाप्रमाणे दिवाळीत रात्री आठ ते दहा यावेळेतच फटाके उडवता येणार आहेत. मोठा आवाज व जास्त धूर करणारे फटाके नसावेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणपुरक फटाके असावेत यावर भर देण्यात आला असून उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका पोलिस कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - पिकांच्या संरक्षणासाठी शेती सभोवताल लावत होते विद्युत तार; शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

फटाक्‍याच्या दणदणाट व विषारी धूर यामुळे देशातील 122 अतिप्रदुषित शहरांमध्ये फटाके विक्रीसह वापरावर राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली आहे. ज्या शहारांमध्ये गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबर, नोव्हेंबर या महिन्यात हवेची सरासरी गुणवत्ता पुअर किंवा त्यावर असेल अशा शहरांमध्ये फटाक्‍यांची विक्री व वापर पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. ज्या शहराची हवेची गुणवत्ता मॉडरेट किंवा त्याखाली असेल अशा शहरांमध्ये हरित फटाक्‍यांच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा - घरी सुरू होती दिवाळीची तयारी अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली

अमरावती शहराचा समावेश समाधनकारक या श्रेणीत असल्यामुळे दिवाळीनिमित्त रात्री 8 ते 10 या दोन तासांत फटाके वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोठा आवाज करणारे व धूर सोडणारे फटाके न उडवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
 

loading image