esakal | शिक्षिकेला मिळाला प्रेमाचा दंड! ‘पीए’च्या प्रेमात पडली अन् निलंबित झाली

बोलून बातमी शोधा

Teacher suspended for falling in love with PA Nagpur crime news}

जिल्हा परिषद विभागाने चौकशी समिती बसवित घटनास्थळ गाठले. शाळा समिती, विद्यार्थी आणि काही गावकऱ्यांचे बयाण झाले. शिक्षिकेचाही कबुलीजबाब झाला.

शिक्षिकेला मिळाला प्रेमाचा दंड! ‘पीए’च्या प्रेमात पडली अन् निलंबित झाली
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : एका माजी मंत्र्याचा पीए. एका शाळेत तळ ठोकून राहायचा. शाळेतील समस्या सोडवायचा. काहीतरी चांगले करू, असे अभिवचन द्यायचा. त्याचा हाच स्वभाव तिला भावला अन् तिशीतील सुंदर शिक्षिका नकळत त्याच्या प्रेमात पडली. प्रेम इतके बहरले की, त्याची चर्चा शाळा शिक्षण समिती अन् गावकऱ्यांत होऊ लागली. शेवटी पीए अन् शिक्षिकेने बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. गावातून पलायन केले. इकडे कुठल्याही अर्जाविना शिक्षिका कर्तव्यावरून पळाल्याने मौदा गटशिक्षण विभाग चिंतेत सापडला. शेवटी तक्रार शिक्षणधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. चौकशी झाली अन् शिक्षण विभागाला या शिक्षिकेवर प्रेमाचा दंड म्हणून निलंबन आदेश काढावे लागले.

अभिनेते अशोक सराफ यांच्या ‘मास्तर एके मास्तर’ चित्रपटाची तंतोतंत कहाणी मौदा पंचायत समितीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. मात्र, निलंबनाने प्रियेशी शिक्षकेसाठी शिक्षण विभागच खलनायकाच्या भूमिकेत उभा ठाकला. हा घटनाक्रमही तितकाच मजेशीर आहे. सदर शिक्षिका विवाहित आहे. ती रोज मौदा ते प्राथमिक शाळेत अपडाऊन करायची.

अधिक माहितीसाठी - काय सांगता, संजय राठोड यांची कॉँगेस उपाध्यक्षपदी वर्णी

राज्याचे माजी मंत्री यांच्या पीएने या शिक्षिकेला हेरले. तो रोज शाळा गाठायचा. शिक्षणासाठी काही लागते का?, शासनपातळीवरून मदत हवी काय म्हणून विचारायचा. पीए महाशयाचा हा दिनक्रम न चुकता व्हायचा. या संपर्कातूनच शिक्षिका पीएच्या प्रेमात अडकली. दोघांचे प्रेम फुलले.

शाळाबाहेर भेटी वाढल्यात. प्रेम प्रकरणाची चर्चा गावात सुरू झाली. शाळा समितीच्या कानावर बाब गेली. त्यांनी शिक्षिकाबाईला हटवा, आमच्या विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. म्हणून मौदा गटशिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभागाला तक्रारी केल्यात.

दरम्यान, गावकरीही आक्रमक झाले. आपल्यालाच येथून निघावे लागेल म्हणून पीए अन् शिक्षिकेने भरल्या वर्गातूनच पलायन केले. शाळा मास्तरीनबाईविना झाल्याने विद्यार्थी, गावकरी वैतागले. शिक्षण विभागाची पुरती झोप उडाली. कसातरी दोघांचा शोध लागला. जिल्हा परिषद विभागाने चौकशी समिती बसवित घटनास्थळ गाठले. शाळा समिती, विद्यार्थी आणि काही गावकऱ्यांचे बयाण झाले. शिक्षिकेचाही कबुलीजबाब झाला.

जाणून घ्या - Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

प्रेमनाट्याने फोडला घाम

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षिकेचे निलंबनाचे आदेश शिक्षण विभागाला काढावे लागले. मात्र, शिक्षिकेच्या प्रेमनाट्याने शिक्षण विभागाला चांगलाच घाम फोडला.

ही बाब खरी
ही बाब खरी आहे. संबंधित शाळेत चौकशी करून शिक्षिकेचा प्रस्ताव निलंबनासाठी सीईओंकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली आहे.
- चिंतामण वंजारी,
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर