सक्तीच्या कोरोना चाचणीला विरोध; शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये रोष

योगेश बरवड 
Tuesday, 17 November 2020

कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बंद झालेले वर्ग दिवाळी लोटूनही सुरू होऊ शकले नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण, कोरोनाचे संकटाची स्थिती काहिशी निवळू लागल्याने सरकारने पुन्हा वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर ः इयत्ता ९, १० व १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणा बंधनकारक करण्यात आली आहे. या अटीमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. कोरोना चाचणी सक्तीची नको तर ऐच्छिक असावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बंद झालेले वर्ग दिवाळी लोटूनही सुरू होऊ शकले नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण, कोरोनाचे संकटाची स्थिती काहिशी निवळू लागल्याने सरकारने पुन्हा वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

 त्यानुसार २३ मार्चपासून ९,१० व १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. ७ ते २० नोव्हेंबर दरम्यान शाळांना दिवाळीच्या सुट्या आहेत. त्यानंतर २२ ला रविवार आहे. अशात नऊ महिन्यांपासून बंद असणाऱ्या शाळा सुरू करण्याची पूर्व तयारी एका दिवसात करायची कशी, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

 या शिवाय दिवाळीच्या सुट्यांमध्येच शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोविड -१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करुन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही अट शिक्षकांमध्ये तिव्र रोष निर्माण करणारी ठरली आहे. चाचणी बंधनकारक न करता ऐच्छिक असावी, या मागणीने जोर घरला आहे..

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 
……..
शिक्षक म्हणतात घाई कशाची?

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य संघटनेसह अन्य संस्थांनी व्यक्त केली आहे. या इशाऱ्यासह अनेक अडचणींकडे दुर्लक्ष करून २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा आट्टाहास कशासाठी? दिवाळीनंतरचा पंधरवाडा निघाल्यानंतर परिस्थिती बघून डिसेंबर मध्ये शाळा सुरू करता येतील, असा सूर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये उमटला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers and workers are not ready to do corona tests