esakal | बीडीओंनी चक्‍क तीन शिक्षकांनाच विस्तार अधिकारी म्हणून दिला अतिरिक्त प्रभार; मुख्यालय अनभिज्ञ
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers given to Charge of extension officer

शिक्षकाकडे केंद्र प्रमुखाचा अतिरिक्त प्रभार देता येते. परंतु मौद्यातील बीईओंनी शिक्षकाकडेच विस्तार अधिकाऱ्याचा प्रभार दिला. यावरून शिक्षण विभागात चर्चाही रंगल्या आहेत. हा प्रभार नियमबाह्य असल्याचे सांगण्यात येते.

बीडीओंनी चक्‍क तीन शिक्षकांनाच विस्तार अधिकारी म्हणून दिला अतिरिक्त प्रभार; मुख्यालय अनभिज्ञ

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : आदर्श शिक्षकाचे प्रकरण अद्याप शांत झाले नसताना एका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी (बीईओ) चक्‍क तीन शिक्षकांनाच विस्तार अधिकारी म्हणून अतिरिक्त प्रभार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हा प्रभार देताना मुख्यालयाला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नसल्याचे समजते.

मौदा येथील बीईओंनी तीन शिक्षकांना विस्तार अधिकाऱ्यांचा अतिरिक्त प्रभार दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीईओंनी परस्पररित्या प्रभार दिला. याची कुठलीही माहिती मुख्यालयाला दिली नाही किंवा परवानगी घेतली नाही. नियमानुसार केंद्र प्रमुखाकडे विस्तार अधिकाऱ्याचा प्रभार देण्यात येते.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

तर विस्तार अधिकाऱ्याकडे गट शिक्षण अधिकाऱ्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात येते. शिक्षकाकडे केंद्र प्रमुखाचा अतिरिक्त प्रभार देता येते. परंतु मौद्यातील बीईओंनी शिक्षकाकडेच विस्तार अधिकाऱ्याचा प्रभार दिला. यावरून शिक्षण विभागात चर्चाही रंगल्या आहेत. हा प्रभार नियमबाह्य असल्याचे सांगण्यात येते.

शिक्षणावर परिणाम!
विस्तार अधिकारी शिकविण्याचे काम करीत नाही. गुणवत्ता वाढण्याबाबतच्या उपाय योजना कराव्या लागतात. अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षणावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

अहवाल आला नाही
हा त्‍यांचा अंतर्गत निर्णय राहू शकतो. तालुक्यात रिक्त पद आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे. मौद्याच्या बीईओकडून अद्याप याबाबत अहवाल आला नाही.
- चिंतामण वंजारी,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.