esakal | कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

want to keep Pleural strong then do these remedies

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या नुकताच पार पडलेल्या 'कोव्हिड संवाद' फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्या ‘फुफ्फुसाचे आजार आणि कोव्हिड’ या विषयावर बोलत होते.

कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला 

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका फुफ्फुसाला असून या अवयवाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. फुफ्फुसाच्या संरक्षणासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे प्या, असा सल्ला राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांनी दिला.

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या नुकताच पार पडलेल्या 'कोव्हिड संवाद' फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्या ‘फुफ्फुसाचे आजार आणि कोव्हिड’ या विषयावर बोलत होते. अनलॉकमुळे सर्व दुकाने, आस्थापना, औद्योगिक कारखाने, थर्मल पॉवर प्लांट्स आदी सुरू झाल्याने प्रदुषणाचे प्रमाण वाढले. यातूनच कोरोनाचा धोकाही वाढला. जुना दमा, क्षय, अस्थमा, सीओपीडी, लंग्स फायब्रोसिस, फुफ्फुसामधील होणाऱ्या बिघाडामुळे होणारा उच्च रक्तदाब यासोबतच ५५ वर्षावरील रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, मुत्रपिंड, यकृताचे आजार असलेल्यांना कोरोना होण्याची जोखिम जास्त आहे.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

 कोरोना हा शरीरातील सर्वच अवयवांवर प्रहार करतो, मात्र यात सर्वाधिक धोका हा फुफ्फुसाला असून कोरोनाचे लवकर निदान, त्वरीत उपचार हाच बचावाचा मंत्र असल्याचे डॉ. मीना देशमुख आणि डॉ.आदित्य परिहार यांनी सांगितले. फुफ्फुसासंबंधी आजार असल्यास आणि त्याचे उपचार सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कुठलीही औषधे घेउ नये, असा सल्लाही त्यांनी दिला. 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोज सकस आहार घ्या. ताजी फळे, हिरव्या भाज्या, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी यासह दुध, दही, आले, लसून, अंडी, चिकनचा आहारात समावेश करा. तेलकट पदार्थ, जंकफूड, मैद्याची पदार्थ खाणे कटाक्षाने टाळाको. यासोबतच शरीराला पुरेशे प्राणवायू मिळावे यासाठी नियमित व्यायाम करा.

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला 

 फुफ्फुसाशी संबंधित व्यायाम करा. कोरोनाचा विषाणू फुफ्फुसावर प्रहार करीत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन धोका आणखी वाढू नये यासाठी दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या, असा सल्ला त्यांनी दिला.

संपादन - अथर्व महांकाळ