शिक्षक पोहोचले विद्यार्थ्यांच्या दारी; घरी जाऊन देतात शिक्षण; ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण उपक्रम  

संजय आगरकर 
Saturday, 7 November 2020

परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे ऑनलाईन शिक्षण यशस्वीपणे पोहचू शकत नाही हीच गोष्ट ल लाखोटिया भुतडा विद्यालय कोंढाळी येथील शिक्षकांनी हेरली

कोंढाळी (जि. नागपूर):  लाखोटीया भुतडा विद्यालय कोंढाली चे अमोल काळे या शिक्षकाने नाविन्यपूर्ण असा उपक्रम हाती घेतला असून कोरोनाने संपूर्ण जीवनमान काही काळासाठी हादरवून सोडले होते आता परिस्थिती जरी आटोक्यात येत असली तरी देखील काही क्षेत्र अजूनही पूर्ववत झालेले नाही. यात शिक्षण क्षेत्राचा देखील समावेश आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधण्यात आला. 

परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे ऑनलाईन शिक्षण यशस्वीपणे पोहचू शकत नाही हीच गोष्ट ल लाखोटिया भुतडा विद्यालय कोंढाळी येथील शिक्षकांनी हेरली. विद्यार्थ्यांचा शाळेशी असणारा संबंध पूर्वीसारखाच जोडून ठेवण्यासाठी तेथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालक व विद्यार्थ्यांच्या भेटी घेत आहेत व त्यांच्या अडचणी वर योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत.

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

 सद्यस्थितीत सरकारच्या निर्देशानुसार ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य आहे. परंतु ग्रामीण भागातील पालक हे मोलमजुरी करून स्वतःच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. तेव्हा त्यांच्याकडे बहुतेक स्मार्टफोन नसतो कदाचित स्मार्टफोन असल्या तरी त्याला रेंज नसते अथवा दर महिन्याला महागाचे रिचार्ज करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाही.

लखोटिया भुतडा विद्यालय कोंढाळी ला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. आता ठिकठिकाणी व्हाट्सअप द्वारे ग्रुप बनवून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हा शिक्षकांचा प्रयत्न असला तरी ग्रामीण विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षणाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे.

ही बाब लक्षात घेऊनच शिक्षक थेट विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचले आहे. विद्यार्थ्यांना नोटबुक व गोष्टीची पुस्तके देखील वाटत आहे. कधी एखाद्याच्या घरी तर कधी गटागटाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे. हे करताना ते विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग मास्क सानीटायझर चा वापर महत्त्वाचा का आहे ते देखील पटवून देत आहेत.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मत प्राचार्य गणेश शेमबेकर यांनी व्यक्त केले आहे या उपक्रमा चे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी सचिव डॉक्टर श्यामसुंदर लद्धड उपाध्यक्ष श्रीमती रेखाताई राठी कोषाध्यक्ष मधुसूदन राठी व शिक्षकांनी व्यक्त केली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teachers in kondhali school are teaching students at their home