ten people coronavirus infection in Nagpur
ten people coronavirus infection in Nagpur

COVID 19 - या शहरात आढळला दहावा रुग्ण, अशी झाली लागण?

नागपूर : शुक्रवार नागपूरकरांसाठी काळावार ठरला. काही दिवसांपासून कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत नसताना अचानक चार रुग्णांची भर पडली. एकाच दिवशी एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना व्हायरची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. यात शनिवारी आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. विविध शहरांमधून परतल्यानंतर कुठलीच वैद्यकीय चाचणी न करता तसेच माहिती दडवून ठेवली जात असल्याने नागपूरकरांच्या चिंतेत भर पडत आहे. 

दिल्लीला कामानिमित्त गेलेले एकाच कुटुंबातील चौघ जण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना व्हायरसची लागण झाली होती. या व्यक्‍तींच्या संपर्कात आलेल्या 18 व्यक्तींची शुक्रवारी तपासणी करण्यात आली होती. त्यातील 17 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, शनिवारी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दहावर पोहोचली आहे. 

दिल्ली प्रवास करून परतलेले आणि मेयो रुग्णालयात भरती असलेले रुग्णांचेच नातेवाईक असून, यात त्याची आई, पत्नी, मुलगा आणि घरी काम करणाऱ्या बाईचा समावेश आहे. गुरुवारी एका रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तो दिल्लीला गेला होता. चारपाच दिवसांपासून तो घरीच होता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि घरकाम करणाऱ्या मोलकरिणीलाही त्याच्यामुळे कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. 

शहरात संचालबंदी आणि लॉकडाउन सुरू आहे. याचा नागपूरमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. भाजी आणि किराणा दुकानांमध्ये तुरळक गर्दी आहे. लोकांमध्येही जागृती निर्माण होत असून, ते स्वतःच घराबाहेर पडणे टाळत आहे. यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळत असला तरी विविध शहरांमधून परतलेल्यांची माहिती दडवून ठेवली जात असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे. 

असे का घडले? - कर्फ्यूमुळे मिळाली नाही दारू... म्हणून अशी भागवली तलफ.. मग
गुरुवारी सापडलेल्या रुग्णाने दिल्ली ते नागपूर असा प्रवास केला होता. परतल्यावर त्याने कुठलीच वैद्यकीय चाचणी केली नव्हती. याची माहितीही त्याने दडवून ठेवली होती. त्याच्यामुळे आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात मुंबई, पुणे, दिल्ली येथून बस तसेच खासगी वाहनाने आलेल्यांची संख्या बरीच आहेत. ते आपल्या कुटुंबीयांसह राहत आहेत. समाजातही मिसळत आहेत. याची माहिती प्रशासनाकडे नाही. यापैकी एखादा रुग्ण असल्यास मोठा धोका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

शहरातील आकडेवारी  
सध्या भरती असलेल्या व्यक्ती 23 
एकूण भरती केलेल्या व्यक्ती 296 
दैनिक तपासणी नमुने 49 
एकूण तपासणी केलेले नमुने 324 
पॉझिटिव्ह नमुने
पाठपुरावा सुरू असलेल्या एकूण व्यक्ती 901 (होम क्वारंटाइन) 
14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती 49 
आज विलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले प्रवासी 17 
सध्या विलगीकरण कक्षात असलेले प्रवासी 122 


नागरिकांची चिंता वाढली

सध्या नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या दहा झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, विविध शहरांमधून परतलेल्यांची माहिती दडवून ठेवली जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com