कर्फ्यूमुळे मिळाली नाही दारू... म्हणून अशी भागवली तलफ.. मग

drinking
drinking

नागपूर : दारू मिळत नसताना तलब भागविण्यासाठी स्पिरीट पिणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला. नीतेश सातकर (43) रा. सावित्रीबाई फुलेनगर असे मृताचे नाव आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने 11 मार्चपासून दारूची दुकानेही बंद आहेत. यामुळे तळीरामांची गैरसोय झाली आहे. व्यसन भागविण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. दारू मिळत नसल्याने नीतेशने बुधवारी सायंकाळी स्पिरीट प्राशन केले. प्रकृती खालावू लागल्याने त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून स्पिरीट उपलब्ध करून देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. 

लोखंडी चॅनेल पळविणारे अटकेत 
रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू असताना विविध बहाण्याने लोखंडी चॅनेल पळवून नेणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सक्करदरा पोलिसांना यश आले आहे. टोळीतील तिघांनी लाखोंचे लोखंडी साहित्य चोरून नेले होते. तिन्ही आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

दुर्गेश अरविंद बनसोड (18), आकाश हेमराज महाजन (27), हर्षदीप नंदकिशोर हिरेखण (23) अशी अटकेतील आरोपींनी नावे आहेत. तिघेही जाटतरोडीतील रहिवासी आहेत. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी वजनी लोखंडी चॅनेल्स वापरले जातात. शिवाय एकदा कॉंक्रीटीकरण साइटवर फारसे कुणीही नसतात. याचाच फायदा तिघेही घेत होते. ते दिवसा फिरून सिमेंट रस्त्याचे काम असलेल्या साइटचा शोध घ्यायचे. संधी मिळताच चारचाकी वाहनातून लोखंडी चॅनेल पळवून न्यायचे. त्यांच्याकडून 5 लाख 82 हजार रुपये किमतीचे 57 लोखंडी चॅनेल, बोलेरो पीकअप व्हॅन, एक दुचाकी व अन्य साहित्य असा एकूण 13 लाख 92 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

दोघांची आत्महत्या 
शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलेसह दोघांनी आत्महत्या केली. कळमना व पारडी हद्दीत या घटना घडल्या. कळमना हद्दीतील बजरंगनगरात राहणाऱ्या सीमा शाहू (35) या विवाहितेने घरीच छताच्या पंख्याला नायलॉनच्या दोराने बांधून गळफास लावून घेतला. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. पारडी हद्दीतील गोंडपुरा हनुमान मंदिराजवळील रहिवासी नीरज वाधवे (20) याने 16 मार्च रोजी दुपारी घरीच छताच्या पंख्याला ओढणीने बांधून गळफास लावून घेतला. वेळीच ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी खाली उतरवून घेत उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com