चोरट्यांच्या मनात भरली ‘मोसंबी’; चक्क शेतातून चार टन मोसंबीची चोरी

अतुल दंढारे
Tuesday, 3 November 2020

मोसंबी बागायतीवर चोरट्यांनी डल्ला लावला असून, तीन ते चार टन मोसंबी चोरून नेली. यात जवळजवळ १२,००० हजारांचा फटका किशोर धोटे यांना बसला आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता चोरट्यांचे नवे मानवी संकट आले आहे.

मेंढला (जि. नागपूर) : ‘चोरांच्या मनात चांदणे’ अशी एक म्हण आहे. परंतु, आजचे चोरटे तर चक्क मोसंबीवर डोळा ठेऊन चोरी करायला लागलेत. नरखेड तालुक्यातील मोसंबी बागायतीमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा हौदोस सुरू आहे. अशीच एक तक्रार सोमवारी (ता. २) जलालखेडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखेड तालुक्यातील जामगाव (खुर्द) येथील शेतकरी किशोर धोटे यांच्या तीन एकर शेतात मोसंबीची फळबाग आहे. शेतातील झाडांवर अंदाजे १५ टन मोसंबी लागली होती. ते रोज रात्री १२ ते १ पर्यंत शेतात जागली करीत होते. परंतु, त्यांना घरी येऊ दिल्यावर चोरट्यांनी डाव साधला.

अधिक वाचा - कांदा, बटाटा तडकला; लाभ व्यापाऱ्यांना; शेतकऱ्यांचे माप रितेच

मोसंबी बागायतीवर चोरट्यांनी डल्ला लावला असून, तीन ते चार टन मोसंबी चोरून नेली. यात जवळजवळ १२,००० हजारांचा फटका किशोर धोटे यांना बसला आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता चोरट्यांचे नवे मानवी संकट आले आहे.

सोमवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना शेतातीळ मोसंबी चोरीला गेल्याचे कळले. शेतकऱ्यांने मोसंबी चोरी गेल्याची तक्रार जलालखेडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास जलालखेडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दीपक डेकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार प्रज्योत तायडे करीत आहेत.

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

शेतकरी चिंतातूर

मोसंबी हे नगदी पीक असल्याने यावर शेतकऱ्यांच्या भरपूर अपेक्षा आहेत. अशात यावर सुद्धा चोरट्यांनी हल्ला चढवल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वीसुध्दा त्यांच्या शेतातील मोसंबी चोरी गेली होती. नरखेड तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली असून चोर मात्र पोलिसांना सापडेणासे झाले आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of four tons of citrus from the field