ग्रामीण भागातील "या' महिला आहेत प्रचंड तणावाखाली, कारण...

वसंत डामरे
गुरुवार, 18 जून 2020

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. या संस्था बचतगटांच्या महिलांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने पतपुरवठा करतात. वसुलीसाठी सतत तगादा लावतात. वसुलीसाठी बचतगटांच्या महिलांकडून घरातील सामानही जप्त करणे हा या संस्थांचा स्थायीभाव आहे. सध्या देशभरात लॉकडाउन आहे.

रामटेक (जि.नागपूर) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाउन आहे. या काळात सर्व कामे बंद असल्याने व लोकांजवळ पैसा नसल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंका, संस्था व सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना सहा महिने कर्जाची वसुली करू नये, असा आदेश दिला आहे. मात्र, तालुक्‍यात कार्यरत सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून बचतगटांच्या महिलांवर कर्जवसुलीसाठी दबाव टाकत असल्याने बचतगटांच्या महिला मानसिक तणावात आहेत.
आणखी वाचा : लॉकडाउन शिथिल करणे नागपुरला पडले महागात, वाचा सविस्तर

अव्वाच्या सव्वा व्याजाने पतपुरवठा
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. या संस्था बचतगटांच्या महिलांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने पतपुरवठा करतात. वसुलीसाठी सतत तगादा लावतात. वसुलीसाठी बचतगटांच्या महिलांकडून घरातील सामानही जप्त करणे हा या संस्थांचा स्थायीभाव आहे. सध्या देशभरात लॉकडाउन आहे. चार महिन्यांचा काळ होत असून सर्वच बचतगटांना जबर आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाउन काळात सर्वसामान्यांचे मानसिक व आर्थिक शोषण होत आहे. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंका, पतपुरवठा संस्था तसेच सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना ग्राहकांकडून सहा महिने कर्ज व व्याज वसुली करू नये अथवा वसुलीसाठी दबाव आणू नये असा लेखी आदेशच दिला आहे. तरीदेखील तालुक्‍यात कार्यरत असणाऱ्या या सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून या आदेशाचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे.

हेही वाचा : "मुंबई रिटर्न' वृद्‌धाचा अहवाल मिळाला पॉजिटिव्ह, पण मृत्यू झाल्यानंतर, मग घडले असे...

या संस्थांची चौकशी करा !
या संस्थांकडून बचतगटांच्या महिलांवर प्रचंड मानसिक दडपण आणले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा प्रकारामुळे बचतगटांच्या महिला प्रचंड दडपणाखाली असून त्यांची या दडपणापासून व आर्थिक लुटीपासून सुटका करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या संस्थांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उदयसिंग  यादव यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "These" women in rural areas are under tremendous stress