तुम्हीच सांगा, पोलिसांनी का दाखल करू नये लॉकडाउन तोडल्याचा गुन्हा?

Thieves robbed a woman's gold chain in Nagpur
Thieves robbed a woman's gold chain in Nagpur
Updated on

नागपूर : चिनमधून आलेला कोरोना व्हायरस आता दुसऱ्या देशांमध्ये आतंक घालत आहे. इटलीमध्ये सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला असताना अमेरिकेने इटलीला मागे टाकले आहे. भारतातही कोरोना चांगलाच पसरत आहे. यामुळेच 14 एप्रिलपर्यंत असलेले लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. नागपुरातही 41 रुग्ण झाल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. मात्र, नागरिक काही केल्या घराबाहेर निघाल्याशिवाय राहत नाही. अशीच एक महिला पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी तिच्यावर लॉकडाउन तोडल्याचा गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे. 

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना कोरोनाला थांबवण्यास अपयशी ठरत असल्याचे वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून दिसून येते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. याचे अनेकांनी स्वागत केले तर अनेकांनी विरोधही दर्शवली आहे.

मागील 13 दिवसांपासून घरातच राहत असलेले नागरिक लॉकडाउनला चांगलेच कंटाळले आहे. ते अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर निघत आहेत. ही बाब पोलिसांच्या लक्षात आली असून, ते नागरिकांना दंडुकाचा प्रसाद देत घरी पाठवत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. कुठे पोलिस विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या युवकांचा हार घालून आणि आरती करून स्वागत करीत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही काढण्यात येत आहेत. मात्र, याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येते. 

नागपुरातील कपिलनगर हद्दीत राहणारी 33 वर्षीय महिला जेवणानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडली. दरम्यान, अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील दोन युवक दुचाकीने तिच्याजवळ आले. मागे बसलेल्या चोरट्याने इकबाल हिच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. यामुळे ती आरडा-ओरड करू लागली. मात्र, कुणीही मदतीला धावून आले नाही. लॉकडाउन आणि संचारबदीमुळे नागरिक घरातच कैद झाले आहेत, हे विशेष... 

लॉकडाउन असताना घराबाहेर पडलीच कशी?

लॉकडाउनमुळे नागरिक घरी राहून वैतागले आहेत. त्यांना आता घराबाहेर पडण्याचा एक कारणच हवे असते. जेवणानंतर शतपावली करण्यासाठी ही महिला घराबाहेर पडली. हीच संधी साधून चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी पळवून नेली. मात्र, तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. तिने घाबरत घाबरत पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, आता हा प्रश्‍न उपस्थित होतो की, पोलिसांनी तिच्यावर लॉकडाउन तोडल्याचा गुन्हा का दाखल करू नये... विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असताना ती बाहेर निघालीच कशी? या कठीण काळात शतपावली अत्यावश्‍यक आहे का?

गस्तप्रणालीवर संशय

कोरोनामुळे देशात लॉकडाउन आणि संचारबंदी कायदा लागू असल्याने शहरातील चौकाचौकांत पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोण कुठे जात आहे याची चौकशी केली जात आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पोलिस असताना चोरट्यांनी संधी साधल्याने कपिलनगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या गस्तप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. नेहमी वादग्रस्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना शहरात घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com