इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची ऑनलाईन हजारोंनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील लोकमान्य नगर, डी. एन. वाजे हाउस, हिंगणा रोड, नागपूर येथे राहणारा भागेश चंद्रभान राऊत (21) बी.ई.चा विद्यार्थी आहे. त्यांच्या मोबाईलवर स्पीकर डॉट कॉम ऑनलाईन शॉपिंगची जाहिरात आली होती. त्यांनी जाहिरात वाचली आणि 11 ऑक्‍टोबर 2019ला स्पिकर डॉट कॉम या वेबसाईटवरून जेबीएल कंपनीचा स्पीकर बुक केला.

नागपूर : स्पीकर डॉट कॉम ऑनलाईन शॉपिंगच्या जाहिरातीवर मागविलेला स्पिकर खराब निघाला. तो परत करण्यासाठी सायबर गुन्हेगाराने फेक लिंक विद्यार्थ्याला पाठविली. लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या खात्यातून 37 हजारांची रक्‍कम परस्पर लंपास केली.

अवश्य वाचा -  डॉन आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतवणार कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील लोकमान्य नगर, डी. एन. वाजे हाउस, हिंगणा रोड, नागपूर येथे राहणारा भागेश चंद्रभान राऊत (21) बी.ई.चा विद्यार्थी आहे. त्यांच्या मोबाईलवर स्पीकर डॉट कॉम ऑनलाईन शॉपिंगची जाहिरात आली होती. त्यांनी जाहिरात वाचली आणि 11 ऑक्‍टोबर 2019ला स्पिकर डॉट कॉम या वेबसाईटवरून जेबीएल कंपनीचा स्पीकर बुक केला. 14 ऑक्‍टोबर 2019 रोजी घरी पार्सल आल्यावर त्यांनी उघडून बघितले असता स्पीकरवर ब्रांडचे नाव नव्हते आणि व आवाज स्पष्ट येत नव्हता. त्याने तो स्पिकर परत करण्यासाठी स्पीकर डॉट कॉम यावेबसाईटवरील कस्टमर केअरच्या नंबरवर 15 ऑक्‍टोबर 2019 रोजी कॉल केला. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून ती लिंक पुन्हा फिर्यादीला आलेल्या मोबाईल नंबरवर परत पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने ती लिंक सेंड केली तेव्हा कस्टमर केअरवरील व्यक्तीने तुमचे पैसे परत मिळतील असे सांगितले. त्यानंतर अनोळखी आरोपीने त्यांना बॅंक अकाउंटचे शेवटचे चार डिजीट व युपीआय पीन मागितला. तो देताच त्यांच्या एसबीआय खात्यातून 37 हजार रुपये कमी झाले. या कमी झालेल्या रकमेचा त्यांना मोबाईलवर मॅसेज आल्यावर भागेशला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने पुन्हा कस्टमर केअरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of engineering students cheat online