आई झाली निष्ठूर; नवजात बाळाला नाल्यात फेकले; परिसरात वेगळीच कुजबूज

अनिल कांबळे
Monday, 26 October 2020

वाठोडा ठाण्याचे एएसआय दिनकर काकडे यांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी मृत अर्भकाला ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध घेणे सुरू केले आहे.

नागपूर : अनैतिक संबंधातून राहिलेल्या गर्भामुळे जन्मास आलेल्या बाळाची लपवणूक करण्यासाठी निष्ठूर मातेने जन्म होताच बाळाला नाल्यात फेकून पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ऐन दसऱ्याच्या दिवशी रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बाळाला सोडून पलायन करणाऱ्या आईविरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबलपूर ते हैदराबाद रोडवर पूल असून त्याखालून नाला वाहतो. रविवारी दहा वाजताच्या सुमारास वाठोडा ग्रामपंचायतचे शिपाई अरविंद गावंडे यांना नाल्यात कपड्यात काहीतरी गुंडाळलेले दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याला नवजात अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसले.

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

त्याने पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. वाठोडा ठाण्याचे एएसआय दिनकर काकडे यांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी मृत अर्भकाला ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध घेणे सुरू केले आहे.

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म!

वाठोडा परिसरातील युवतीला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली होती. अपत्याचा जन्म झाल्याबरोबरच युवतीच्या नातेवाईकांनी हे अपत्य पुलावरून नाल्यात फेकून पळ काढला, अशी कुजबूज परिसरातील नागरिकात सुरू होती. पुढील तपास पोलिस करीत आहे. या रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहे. एक अलिशान कार पुलावर थांबली होती. कारमधून एक युवती आणि युवक खाली उतरले. त्यांनी कपड्यात गुंडाळलेले काहीतरी पुलावरून खाली फेकल्याची माहिती एका वृद्धाने दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thrown a baby born of an immoral relationship