
हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (ता.२३ ऑक्टोबर) पर्यंतच्या कालावधित अकोला जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
अकोला ः हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (ता.२३ ऑक्टोबर) पर्यंतच्या कालावधित अकोला जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
जिल्ह्यातील मोठे, मध्यम व इतर लघू प्रकल्पामध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, इतरही प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे. प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवून प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी याबाबत नदीपात्रा शेजारील गावातील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित रहण्याचे तसेच नागरिकांनी नदी, नाल्यांना पूर असताना पुल ओलाडण्याचा प्रयत्न करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची दिशा थेट महाराष्ट्रावर नसल्याने त्याचा राज्याच्या दृष्टीने प्रभाव क्षीण ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांच्या काळात मध्यम स्वरूपाचा, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, सुमारे १५ दिवसांपासून थांबलेल्या परतीच्या पावसाच्या प्रवासाला सध्या चालना मिळाली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)