यालाच म्हणतात नशीब! खात्यातून चोरीला गेले लाखो रुपये, पण तीन महिन्यानंतर मिळाले परत

traders got stolen money with help of cyber crime in nagpur crime news
traders got stolen money with help of cyber crime in nagpur crime news

नागपूर :  एका नोकराने मालकाच्या बँक खात्यातून २६ लाख ५० हजार रुपये परस्पर उडवले. तब्बल तीन महिन्यानंतर मालकाला कुणकूण लागली. अचानक खात्यातून एवढी मोठी रक्कम उडाल्यामुळे व्यापाऱ्याला धक्का बसला. या प्रकरणात सायबर क्राईमने तांत्रिक पद्धतीने तपास करीत व्यापाऱ्याला पूर्ण रक्कम परत मिळवून दिली. 

विनोद हेमनानी असे त्या पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. ते मसाला व्यापारी आहेत. व्यवसायानिमित्त ते नेहमीच बँकेच्या माध्यमातून व्यवहार करतात. बँक खात्याची संपूर्ण माहीत त्यांच्याच परिचयातील एकाने घेतली. २३ नोव्हेंबर रोजी त्यांची बनावट स्वाक्षरी करत हेमनानी यांच्या नावाने त्यांचा बँक खाता असलेल्या आयसीआयसीआय बँकेत अर्ज दिला. हेमनानी यांच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदलण्याची विनंती केली. बँकेनेही हेमनानी यांच्याकडे चौकशी न करता अर्ज ग्राह्य धरला आणि नेटबँकिंगचा मोबाईल क्रमांक बदलून दिला. त्यामुळे रक्कम वळती करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्याने एका रात्रीत हेमनानी यांच्या खात्यातून तब्बल २६ लाख ५० हजार रुपये इतर बँक खात्यात वळते केले. मात्र, हेमनानी यांचा मूळ भ्रमणध्वनी क्रमांकाचा नेटबँकींगशी संपर्क तुटल्याने मोठी रक्कम वळती केल्या नंतरही त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला नाही. काही दिवसांनी हेमनानी व्यवहारासाठी बँकेत गेले असता बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यात एकही रुपया शिल्लक नसल्याची माहिती दिली. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आपण कोणताही अर्ज आपण केलेला नसल्याचे हेमनानी यांनी स्पष्ट केल्यावर बँकेने लगेच काढण्यात आलेल्या रकमेचा शोध सुरू केला. ही रक्कम सायबर क्राईमने व्यापाऱ्याला परत मिळवून दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com