...अन्‌ पोलिसांनी कानठळ्या बसविणाऱ्या सायलेंसरचा काढला आवाज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

जोराचा आवाज करीत जाणाऱ्या वाहनचालकांना थांबवून कारवाई केली जाते. ताबडतोब गाड्यांचे मोडीफाय केलेले सायलेंसर बदलविण्यात येत आहेत. वाहनचालकांना सायलेंसर आणायला सांगितले जाते. सोबत असणाऱ्या मेकॅनिककडून ते बदलवून दिले जाते. नियमात नसणारे जुने सायलेंसर जप्त करण्यात येत आहेत. 

नागपूर : शहरात कर्कश आवाज करीत जाणाऱ्या गाड्या नेहमीच्याच आहेत. रस्त्यावरून पायी जात असलेल्या नागरिकाच्या मागून अचानक मोठ्याने आवाज करीत गाडी निघून जाते. यामुळे त्याच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना याचा नेहमीच त्रास होत असतो. अशा वाहनांवर नेहमीच पोलिसांकडून कारवाई होत असते. मात्र, याचा उपयोग होत असल्याचे दिसून आले नाही. मात्र, आता... 

कर्कक हॉर्न लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असते. कारण, आवाजामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, कोरोनाचा देशात शिरकाव झाला आणि लॉकडाउन सुरू झाल्यामुळे. लॉकडाउनमुळे नारिकांचे घराबाहेर निघणे बंद झाले. रस्त्यांवर वाहने दिसत नव्हते. यामुळे कर्कश अवाज बंद झाला होता. तसेच कर्कश आवाजापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

महत्त्वाची बातमी - शिक्षकांसाठी शाळा २६ पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश

मात्र, आता लॉकडाउनचे नियम शिथिल होताच नागपूरकर बेफिकीर झाले आहेत. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न आणि कानठळ्या बसविणारे सायलेंसरचे आवाज पुन्हा घुमू लागले आहेत. वाहतूक शाखा पोलिसांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. चौकाचौकांत कारवाई करणारे पथक दिसून येत आहेत. कारवाईच्या ठिकाणी मेकॅनिकही सोबतच ठेवण्यात येत आहेत. 

जोराचा आवाज करीत जाणाऱ्या वाहनचालकांना थांबवून कारवाई केली जाते. ताबडतोब गाड्यांचे मोडीफाय केलेले सायलेंसर बदलविण्यात येत आहेत. वाहनचालकांना सायलेंसर आणायला सांगितले जाते. सोबत असणाऱ्या मेकॅनिककडून ते बदलवून दिले जाते. नियमात नसणारे जुने सायलेंसर जप्त करण्यात येत आहेत.

क्लिक करा - शासन निर्देशानुसारच शाळा सुरु होणार, असे आहेत शासनाचे निर्देश

लाईक्‍स आणि कमेंटचा पाऊस

शुक्रवारी एकाच दिवशी 87 वाहनचालकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी या कारवाईचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले आहेत. त्यावरही नागपूरकरांकडून लाईक्‍स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. 

विभागनिहाय चालान कारवाई

 • विभाग प्रकरणे 
 • अजनी 2 
 • कॉटन मार्केट 14 
 • इंदोरा 13 
 • कामठी 5 
 • लकडगंज 5 
 • सदर 13 
 • सक्करदरा 5 
 • सीताबर्डी 28 
 • सोनेगाव 2 
 • एकूण 87 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic branch police action on vehicles