पोलिस उपायुक्तांच्या वाहनाला ट्रकची धडक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

शुक्रवारी सायंकाळी पोलिस उपायुक्त नीलोत्पल हे आपल्या शासकीय वाहनातून कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले होते. जरीपटका पोलिस ठाण्याजवळील चौकात रेड सिग्नल असल्याने चालकाने कार थांबविली.

नागपूर : शुक्रवारी सायंकाळी पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांच्या वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. जरीपटका पोलिस ठाण्याजवळील चौकात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. 

शेख सैफून (24, रा. पश्‍चिम बंगाल) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी पोलिस उपायुक्त नीलोत्पल हे आपल्या शासकीय वाहनातून कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले होते. जरीपटका पोलिस ठाण्याजवळील चौकात रेड सिग्नल असल्याने चालकाने कार थांबविली. त्याचवेळी 12 चाकी ट्रक मागून कारवर धडकला. 

असे का घडले? - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत
 

सुदैवाने ट्रकची गती कमी असल्याने उपायुक्त नीलोत्पल आणि त्यांच्या शासकीय चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. केवळ कारच्या एका दाराचे काहीसे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच जरीपटका ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. ट्रकचालक शेख सैफून आपल्या सिटवरच बसून होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. वेळीच ब्रेक न लागल्याने डॅश लागल्याचे त्याचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck hits Deputy Commissioner of Police vehicle