डोळ्यात तिखट फेकून खून करण्याचा प्रयत्न

अनिल कांबळे
Monday, 21 September 2020

चिडलेल्या आरोपींनी पाठीमागे लपविलेली तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड काढले आणि अनिकेतच्या डोळ्यात तिखट फेकले. त्यानंतर अनिकेतवर अचानक हल्ला केला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी अनिकेतला मित्रांनी मेयो रुग्णालयात दाखल केले.

नागपूर : जुन्या वादातून तिघांनी एका युवकाच्या डोळ्यात तिखट फेकून तलवार आणि चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना रविवारी रात्री दहा वाजता सदरमध्ये उघडकीस आहे. अनिकेत मुकेश अंगलवार (२७, रा. खलासी लाईन) असे जखमी युवकाचे नाव असून तो मेयो रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा रविवारी रात्री साडे नऊ वाजता खलासी लाईन चौरसिया चौकात मित्रासोबत उभा होता. दरम्यान, आरोपी उमेश उर्फ अम्मू मनोजकुमार पैसाडेली (वय २५, रा. कडबी चौक), मॉरीस आरीकस्वामी फ्रांसीस आणि फरहान उर्फ गट्टू फिरोज बेग (दोघेही रा. कॅथलिक क्लब, खलासी लाईन) हे तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून अनिकेतशी वाद घातला.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

चिडलेल्या आरोपींनी पाठीमागे लपविलेली तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड काढले आणि अनिकेतच्या डोळ्यात तिखट फेकले. त्यानंतर अनिकेतवर अचानक हल्ला केला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी अनिकेतला मित्रांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सदर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नव्हती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ttempted murder by throwing red pepper in the eye