Tukaram Mundhe removed from the post of CEO of Smart City
Tukaram Mundhe removed from the post of CEO of Smart City

सत्ताधारी पडले तुकाराम मुंढेंवर भारी; दिला 'स्मार्ट' धक्‍का 

नागपूर : महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओ पदावरून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना हटवून सत्ताधाऱ्यांनी त्यांना चांगलाच झटका दिला. विशेष म्हणजे मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे अध्यक्ष प्रवीण परदेसी यांनी आपणास फोनवरून नियुक्त केल्याचा दावा केला होता. आजच्या बैठकीत महापालिकेचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्याकडे सीईओपदाचा कार्यभार सोपण्याचा निर्णय घेण्यात आला. 

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकपदी मुंढे यांची नियुक्ती आणि त्यानंतर सर्वांच्या सहमतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती या दोन विषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सुमारे पाच महिन्यानंतर कंपनीच्या बैठकीला प्रवीण परदेसी हे देखील उपस्थित होते.

महापौर संदीप जोशी यांच्यासह जवळपास सर्वच संचालकांचा मुंढे यांना सीईओ म्हणून नियुक्तीस विरोध दर्शवला होता. तत्पूर्वीच मुंढे यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी कंपनीतील नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले तसेच सुमारे 20 कोटी रुपयांचा निधीसुद्धा खर्च केला. 

महापालिकेतील सत्तधारी भाजपने नियुक्तीपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. संचालकच नसताना कुठल्या अधिकारात मुंढे यांनी निर्णय घेतले असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. आपल्या कंत्राटदारांना लाभ पोहोचवण्यासाठी मुंढे यांनी नियमबाह्य कामे केली तसेच आर्थिक अनियमितता केल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणने आहे. या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा महापौरांना नोंदवली असून, उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे.

फोनवरून अधिकार सोपवल्याचा मुंढे यांचा दावा

स्मार्ट सिटीचे माजी सीईओ रामनाथ सोनवणे यांची बदली झाली आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर परदेसी यांनी आपणास सीईओपदाची जबाबदारी सोपविली होती असा दावा मुंढे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी फोनवरून परदेसी यांनी अधिकार सोपवल्याचे मुंढे यांनी जाहीर केले होते.

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com